परभणी : वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:55 PM2019-06-16T23:55:17+5:302019-06-16T23:55:34+5:30
जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील करवली- कसर रस्त्यावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहेत़ ही घटना १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली़
करपरा नदीच्या पात्रातून अनेक दिवसांपासून वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती़ या वाळू उपस्याची माहिती प्रभारी तहसीलदार परेश चौधरी यांना मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकामार्फत सापळा रचून या रस्त्यावरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले़ ही कार्यवाही बोरीचे तलाठी नितीन बुड्डे, सचिन लेंगुळे, जे़ के़ घुगे, धनंजय सोनवणे यांच्या पथकाने केली.
४जिंतूर तालुक्यातील करपरा येथील नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे.
४त्यामुळे या भागात दररोज अनेक वाहने वाळू वाहतुकीसाठी येतात.
४शुक्रवारी महसूलच्या पथकाने ट्रॅक्टरविरुद्ध कारवाई केली असली तर प्रत्यक्ष नदीपात्र परिसरातही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.