परभणी:संत बाळू मामांची पालखी आज कुंभारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:40 AM2017-12-19T00:40:18+5:302017-12-19T00:40:27+5:30
तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.
श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचे गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात आगमन झाले आहे. पूर्णा तालुक्यातील कौडगाव व परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, शहापूर या गावांमध्ये पालखीचा ६ दिवसांचा मुक्काम राहिला. या मुक्कामा दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहापूर व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पालखीचे कुंभारी गावात आगमन होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांच्या वतीने या पालखीच्या आयोजनाची तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी पालखी दाखल झाल्यानंतर गावातून या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या पालखीचा सहा दिवस कुंभारीत मुक्काम राहणार आहे. या सहाही दिवशी कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशितील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टाकळी, शहापूर येथे भाविकांची मांदीयाळी
४परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान संत बाळूमामा पालखीचा मुक्काम होता. तर शहापूर येथे १३ ते १८ डिसेंबर दरम्यान पालखीचा मुक्काम होता. पालखीच्या दर्शनासाठी दर दिवशी जवळपास ५ हजारच्या वर भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. तसेच १२ दिवस शहापूर व टाकळी कुंभकर्ण ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी टाकळी कुंभकर्ण व शहापूर या गावांमध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.