परभणी : लोकसभेसाठीच्या मतदान यंत्रावर आज ‘मॉक्पोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:22 AM2018-11-01T00:22:09+5:302018-11-01T00:25:11+5:30
भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रावर १ आॅक्टोबर रोजी शहरातील कल्याण मंडपम् येथे मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया ) करण्यात येणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रावर १ आॅक्टोबर रोजी शहरातील कल्याण मंडपम् येथे मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया ) करण्यात येणार आहे़
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला २ हजार ९८६ बॅलेट युनिट, १ हजार ७३६ कंट्रोल युनिट आणि १ हजार ७३६ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध झाल्या आहेत़ उपलब्ध सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़
या प्रक्रियेंतर्गत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन माहिती घेतली़ त्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपलब्ध मतदान यंत्रावर मॉक्पोल (अभिरुप मतदान प्रक्रिया) घेण्यात येणार आहे़
यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांना उपस्थित राहून मतदान करून आपले मतदान कोणाला झाले याबाबतची पडताळणी करता येणार आहे़ यावेळी व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात येणार आहेत़ लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी केले आहे़
बेंगलोरच्या पथकाकडून झाली होती तपासणी
४लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि़ कंपनीचे अभियंता प्रभाकर आनंद यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यीय पथकाने २५ आॅक्टोबर रोजी तपासणी केली होती़ यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन या अधिकाºयांनी केले होते़
४लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपली़ निवडणूक विभागाकडे ३१ आॅक्टोबरपर्यंत दाखल अर्जांमधील मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत़ १ नोव्हेंबरपासून मात्र नवीन नावांची नोंद होणार नाही़ ४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठीची अंतीम मतदार यादी जाहीर होणार आहे़