परभणी : नांदेडसाठी आज पाणी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:23 AM2018-03-11T00:23:50+5:302018-03-11T00:23:56+5:30
तालुक्यातील डिग्रस बंधाºयातून रविवारी नांदेडसाठी सकाळी ११ वाजता २० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे डिग्रस बंधारा परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाइला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (जि. परभणी): तालुक्यातील डिग्रस बंधाºयातून रविवारी नांदेडसाठी सकाळी ११ वाजता २० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे डिग्रस बंधारा परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाइला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच वादात सापडत आहे़ बंधाºयातील ७२ टक्के साठा नेहमीच नांदेडसाठी आरक्षित करण्यात येत आहे़ दरवर्षी पाणी सोडताना वाद उद्भवत असल्याने अधिकारी पाणी सोडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच हालचाली करीत आहेत़ विष्णूपुरी बंधाºयामध्ये मुलबक पाणीसाठा असूनही डिग्रसचे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी पळविण्याचा घाट घातला जात आहे़ यावर्षी सध्या डिग्रस बंधाºयामध्ये ३१ दलघमी साठा आहे़ यातूनही रविवारी सकाळी ११ वाजता नांदेडसाठी २० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे़ डिग्रस बंधाºयावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नांदेड शहरात असल्याने पाणी सोडण्याच्या हालचाली वेगवान होत आहेत. दरम्यान, नांदेडला पाणी सोडताना प्रशासनाकडून दोन टप्पे केले जातात़ पण, स्थानिक शेतकरी व जनता पाणी सोडण्यास तीव्र विरोध करीत असल्याने आरक्षित पाणी यासाठी एकाच टप्प्यात नेले जात आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे़