परभणी :पोटनिवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:30 AM2018-02-27T00:30:15+5:302018-02-27T00:30:20+5:30
जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेतला जात असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेतला जात असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिंतूर तालुक्यात मारवाडी, घागरा, बोरी, चारठाणा या चार ग्रामपंचायतीमध्ये ६ जागांसाठी पाथरी तालुक्यात वाघाळा आणि पोहेटाकळी ग्रामपंचायतीत ५ जागांसाठी, पूर्णा तालुक्यातील ताडकळस, हिवरा बु. येथील दोन जागांसाठी, सेलू तालुक्यात निपाणी टाकळी, निरवाडी खु., गव्हा, हादगाव खु., कुडा या ग्रामपंचायतींमध्ये पाच जागांसाठी, गंगाखेड तालुक्यामध्ये मैराळ सावंगी, सुप्पा, खादगाव, धारासूर ग्रामपंचायतीत चार जागांसाठी, परभणी तालुक्यात दैठणा, ताडपांगरी आणि करडगाव ग्रामपंचायतीमध्ये तीन जागांसाठी तर सोनपेठ तालुक्यातील करम ग्रामपंचायतीतील एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे.
दरम्यान, पोट निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील वातावरण तापले होते. उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला असून आता २७ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. मतदान होणाºया ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जिल्हा प्रशासनाने सुटी घोषित केली आहे. मतदानाच्या निमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.