परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:36 AM2019-08-17T00:36:23+5:302019-08-17T00:36:38+5:30

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

Parbhani: Traffic conditions due to shortage of buses | परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

परभणी: बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिवस पडून राहत आहेत. बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. या सातही आगाराला जोडणारा दुवा म्हणजे परभणी येथील आगार आहे. परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या आगारातून जिल्ह्यातील ९ तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारात थेट बससेवा असणे आवश्यक आहे; परंतु, एकीकडे १३ कोटी रुपये खर्च करुन बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन झाले असताना दुसरीकडे याच आगारातील प्रवाशांना बसच उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे गुरुवारी व शुक्रवारी दिसून आले. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसला होणारी गर्दी लक्षात घेता परभणी बसस्थानक आगार प्रशासनाने प्रवाशांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते; परंतु, तसे होताना दिसून आले नाही.
परभणी आगारामध्ये ६८ बसेस आहेत. यातील १५ बसेस दररोज दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. त्यामुळे उर्वरित ५३ बसच्या माध्यमातून आगारातून ६४ फेºया मारल्या जातात. त्यामुळे अनेक तालुक्यांसह ग्रामीण भागात बस पोहचविण्यासाठी विलंब होत आहे. त्याच बरोबर गाडी नादुरुस्त झाल्यास अनेक बसफेºया रद्द झाल्याचेही प्रकार समोर आले आहे. ज्या बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. त्याही खिळखिळ्या झालेल्या आहेत. या बसमधूनच प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. नव्या बसची परभणी आगाराने मागणी करुनही बस मिळत नसल्याने आहे, त्याच बसेसवर भागवावे लागत आहे. यामुळे भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागीय नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन परभणी आगाराला नवीन बस उपलब्ध करुन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
ग्रामीण भागात: भंगार बसच्या फेºया
४परभणी आगारातून तालुक्यातील उमरी, लोहरा, भोसा, कुंभारी बाजार, साडेगाव, मांडाखळी, पेडगाव, स.पिंपळगाव, रामपुरी यासह अनेक गावांमध्ये बसफेºया सुरु आहेत. यातून आगाराला मोठे उत्पन्नही मिळते; परंतु, मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागात जाणाºया बसेस या पूर्णत: खिळखिळ्या झाल्या आहेत.
४ काही बसेसच्या तर खिडक्या, तावदाने, आसन व्यवस्था मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच बरोबर प्रचंड धुळीच्या वातावरणात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र आगार प्रशासन, ना विभागीय नियंत्रकांचे लक्ष आहे. परिणामी नाईलाजास्तव ग्रामीण भागातील प्रवाशांना बसने प्रवास करणे भाग पडत आहे.
४परभणी आगारातून धावणाºया बसेसमधून मोठ्या प्रमाणातून धूर बाहेर पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी प्रवाशांसह नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. भंगार बसेस बंद करुन नवीन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Web Title: Parbhani: Traffic conditions due to shortage of buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.