परभणी : शालेय गुणवत्ता वाढीसाठी ३४२ शिक्षकांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:17 AM2020-01-13T00:17:48+5:302020-01-13T00:18:27+5:30
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सोनपेठ तालुक्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी ३४२ शिक्षकांना निष्ठा (नॅशनल इन्सेंटीव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टिचर्स होलीस्टीक अॅडव्हान्समेंट) कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सोनपेठ तालुक्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी ३४२ शिक्षकांना निष्ठा (नॅशनल इन्सेंटीव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टिचर्स होलीस्टीक अॅडव्हान्समेंट) कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडणार आहे़
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शालेय गुणवत्ता वाढीवर मागील काही दिवसांपासून भर दिला जात आहे़ या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ त्यासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने निष्ठा या संस्थेची निवड केली असून, संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे़
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसंदर्भात विविध विषयावर तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ यामध्ये तालुक्यातील पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील ३४२ शिक्षकांना निष्ठाकडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ माहिती तंत्रज्ञानातील अत्याधुनिक साधनांचा वापर करून गाव पातळीवर शिक्षण मिळणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे़ त्यामुळे भविष्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना अनेक विषयांची सखोल माहिती मिळणार आहे़
सोनपेठ तालुक्यातील शिक्षकांना शहरातील व्हिजन पब्लिक स्कूल येथे १३ ते २४ जानेवारी दरम्यान दोन टप्प्यात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे़
पहिल्या टप्प्यामध्ये १३ ते १७ जानेवारी या कालावधीत १७० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, २० ते २४ जानेवारीपर्यंत दुसºया टप्प्यातील १७२ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ यामध्ये अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापन शास्त्र, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तीक व सामाजिक गुण वैशिष्ट्ये समावेशित शिक्षण, अध्यापन, अध्ययनात माहिती व तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर, आरोग्य व योग ग्रंथालय पर्यावरण क्लब, किचन गार्डन, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुण वैशिष्ट्ये, शाळापूर्व शिक्षण, आनंददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन आदी विषयांवर १३ जानेवारीपासून निष्ठाच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे़ यासाठी संगणक प्रोजेक्टरसारख्या आधुनिक साधनांचा वापर करून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण हे प्रशिक्षण प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत़
त्याचबरोबर परभणी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील येथील अधिव्याख्याता अनिल जाधव प्रशिक्षण देणार आहे़ त्यामुळे दोन टप्प्यांत होणाºया या प्रशिक्षणातून तालुक्यातील ३४२ शिक्षक प्रशिक्षीय होणार असून, त्याचा फायदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
प्रशिक्षणासाठी तीन कुलांची निवड
४सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळेतील ३४२ शिक्षकांना निष्ठाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ प्रशिक्षण प्रभावी व परिणामकारक व्हावे, यासाठी तीन कुल असून, प्रत्येक कुलाचा केंद्रप्रमुख हा कुलप्रमुख म्हणून निवडण्यात आला आहे़
४त्याचबरोबर प्रत्येक कुलामध्ये तीन सहाय्यक कुलप्रमुख असणार आहेत़ त्यामुळे आजपर्यंत झालेल्या प्रशिक्षणामध्ये बहुतांश शिक्षकांनी दांड्या मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत़ त्यामुळे किमान मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षणास शिक्षक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे़