परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:38 AM2018-08-01T00:38:35+5:302018-08-01T00:39:38+5:30
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी:महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.
त्यात परभणी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सी.यू. शिसोदे यांची बदली ठाणे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.
जिंतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.आर. चव्हाण यांची उदगीर पंचायत समितीत, पूर्णा पं.स.चे गटविकास अधिकारी व्ही.यू. सुरोशे यांची वसमत पंचायत समितीमध्ये, गंगाखेड पं.स.चे गटविकास अधिकारी टी.बी. शिंदे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पं.स.मध्ये, सोनपेठ येथील गटविकास अधिकारी एम.वाय. अभंगे यांची रेणापूर येथे, पालमचे गटविकास अधिकारी एम.बी.कोळी यांची अक्कलकोट येथे बदली करण्यात आली आहे.
तसेच औरंगाबाद जि.प.तील उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. जाधव (कापसे) यांची बदली परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग येथे झाली आहे. तर परभणी जि.प.तील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर यांची बदली परभणी जिल्हा परिषदेतच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाली आहे.