परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:31 AM2019-07-28T00:31:56+5:302019-07-28T00:33:39+5:30

उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्डीत वृक्षलागवड ही लोक चळवळ बनली आहे. श्रमदानातून येथील ग्रामस्थांनी १० हजार वृक्षाची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे.

Parbhani: Tree plantation became a people's movement | परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ

परभणी : वृक्षलागवड बनली लोकचळवळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्डीत वृक्षलागवड ही लोक चळवळ बनली आहे. श्रमदानातून येथील ग्रामस्थांनी १० हजार वृक्षाची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे.
डोंगराळ भागात असलेले पार्डी हे गाव उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखले जाते; परंतु येथील ग्रामस्थांनी लोक सहभागातून गावातील जिल्हा परिषदशाळा आदर्श बनविली. त्याचबरोबर तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षलागवड आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दोन महिन्यांपूर्वी श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी गावकºयांशी संवाद साधून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्व त्यांना पटवून दिले होते. त्यानंतर पावसाळा सुरु होताच प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरान जमीन, रस्त्याच्या दुतर्फा शाळा परिसर आणि प्रत्येक घरासमोर वृक्षलागवड करण्यासाठी खड्डे खोदले. पाऊस होताच या खड्ड्यामध्ये कडी लिंबू, पिंपळ, साग, वड इ. वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
२२ जुलै रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यापूर्वी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद काष्टे, जि. प. सदस्य राजेंद्र लहाने, गटविकास अधिकारी कादरी, गटशिक्षणाधिकारी जयंत गाडे, सरपंच माऊली राठोड, छगन शेरे आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढून ग्रामस्थांनी दहा हजार वृक्ष लागवड करुन संवर्धनाचा संकल्प केला.
विशेष म्हणजे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास घरासमोर वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे देण्यात आली. तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी त्याच विद्यार्थ्याचे नाव झाडाला देण्यात आले.
रस्याच्या दुतर्फा आणि शेत शिवारातील बांधावर डोंगराळ भागात वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यासाठी त्या ठिकाणच्या शेतकºयांनी झाडाला पाणी देण्याची हमी घेतली आहे. तसेच ज्या वृक्षाची लागवड केली आहे, अशा वृक्षांना स्वत: ग्रामस्थ पाणी टाकत आहेत. गायरान जमिनीत लावलेल्या वृक्षांना बारमाही पाणी मिळावे, याकरिता तुळजाभवानी प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ ठिबकद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
डोंगराळ परिसरात फळझाडांची वृक्ष लावण्यात आली आहेत. निसर्गरम्य या परिसरात वृक्षाचे संवर्धन झाल्यानंतर पार्डी या गावाला नवी ओळख प्राप्त होईल, अशी खात्री ग्रामस्थांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. वृक्ष लागवडीत प्रत्येक घरातील लहान मोठ्या व्यक्तींनी सहभाग घेतला. खड्डा खोदण्यापासून ते वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी देखील वृक्ष लागवडीचा फायदा ग्रामस्थांना पटवून देत विद्यार्थ्यांनाही या चळवळीत सहभागी करुन घेतले आहे.
एक वर्ष वृक्ष संवर्धनाची घेतली जबाबदारी
श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानने गावकºयांना वृक्ष उपलब्ध करुन दिले. तसेच एक वर्ष वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे. गावकºयांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत गायरान जमिनीत केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी या परिसरात गावातील जनावरे नेणार नसल्याचा संकल्प केला आहे. शेत शिवारात आणि बांधावर लावण्यात आलेल्या वृक्षांना त्या-त्या परिसरातील शेतकरी पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. पार्डी या गावात लोकसहभागातून वृक्ष लागवड लोकचळवळ बनली आहे.

Web Title: Parbhani: Tree plantation became a people's movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.