परभणी : हळद खरेदीस होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:08 AM2019-05-06T00:08:09+5:302019-05-06T00:08:30+5:30
येथील बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अक्षयतृतियाच्या मुहूर्तावर हळदीचा लिलाव सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : येथील बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अक्षयतृतियाच्या मुहूर्तावर हळदीचा लिलाव सुरू होणार आहे.
हळद लिलाव खरेदी तारीख ठरविण्या संदर्भात ४ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती गंगाधरराव कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती पंकज आंबेगावकर, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संचालक ज्ञानेश्वर मोरे, माऊली काळे, संजय लड्डा, रामविलास सारडा, जुगल काबरा, विजय पोरवाल, बाळू बांगड, रहीमभाई, पंकज लाहोटी, राधाकिशन शिंदे, दामोधर बांगड, वामनराव कोक्कर, दिनकर कोक्कर, नितीन कत्रुवार, गंगाधर मोरे, राजू काबरा, प्रतिक मंत्री, संजय यादव, बापूराव चिंचलवाड, नितीन लाहोटी यांची उपस्थिती होती. या बैठकीत लिलावाची पद्धत, नियोजन या संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष हळदीचा लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतल्याने परभणी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळद विक्री करण्यासाठी वसमत येथील बाजारपेठ जवळ करावी लागत होती. मात्र आता मानवत बाजार समितीत हळदीचा लिलाव सुरू झाल्याने शेतकºयांच्या वाहतुकीच्या खर्चाची बचत होणार असून ये-जा करण्यासाठी लागणारा वेळही वाचणार आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकºयांनी हळद विक्रीसाठी मानवत बाजारपेठेत आणावी, असे आवाहन सभापती कदम यांंनी केले आहे.