परभणी : दोन मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:28 AM2019-05-11T00:28:37+5:302019-05-11T00:29:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी/बोरी ( परभणी ) : पाथरी तालुक्यातील वरखेड आणि जिंतूर तालुक्यातील कोक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी/बोरी (परभणी) : पाथरी तालुक्यातील वरखेड आणि जिंतूर तालुक्यातील कोक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील कोक येथील रहिवासी राजू साळुंके (४०) या तरुणाचा मृतदेह परभणी- जिंतूर रस्त्यालगत ऋत्विक कन्स्ट्रक्शन समोरील गोविंदराव कंठाळे यांच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. मयत तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत असल्याने याबाबतची माहिती सदर शेतकऱ्याने बोरी पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी परदेसी, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, जमादार व्ही.एम.गिरी, के.जी. पतंगे, बी.डी. शिंदे, ज्ञानेश्वर चोपडे, एस.पी.सानप, पोकॉ.सुनील कटारे यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तपासामध्ये मयत हा कोक येथील राजू साळुंके असल्याचे स्पष्ट झाले. तो बोरी येथील एका धाब्यावर वेटर म्हणून काम करीत होता. तसेच तो गेल्या दोन - तीन दिवसांपासून घरी गेला नसल्याचे चौकशीत समजले. या प्रकरणी बोरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुजलेला मृतदेह आढळला
४पाथरी तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी बळीराम देविदास तोंडे यांच्या शेतात ९ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शंकर जयवंत फासाटे (६८ रा.डोंगरगाव) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.याबाबतची माहिती पाथरी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे, सपोनि.पवार, पोलीस नाईक माने, भारती आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
४मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील गावांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मयत व्यक्ती शंकर फासाटे असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचे पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
४मयत शंकर फासाटे यांची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्यामुळे ३० एप्रिल रोजी ते घरातून निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु, ते आढळून आले नाहीत. पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.