परभणी : पिंप्री येथील आगीत गोठा जळून दोन म्हशी दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:44 PM2019-04-23T23:44:27+5:302019-04-23T23:44:37+5:30
जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़
पिंप्री गिते येथील केशव रावसाहेब गिते यांच्या शेतात असलेल्या गोठ्यास सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीने रौद्ररुप धारण केल्याने काही क्षणात हा गोठा जळून खाक झाला़ त्याचबरोबर या गोठ्यात बांधलेल्या म्हशी दगावल्याची घटना घडली़ गोठ्याशेजारी बांधलेले दोन बैलही जखमी झाले आहेत़
गोठ्यात ठेवलेले पीव्हीसी पाईप व शेती औजारेही जळून खाक झाली आहेत़ या घटनेत रावसाहेब गिते यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़ या घटनेची माहिती ग्रामस्थांनी जिंतूर तहसील कार्यालयास दिली़ त्यानंतर चारठाणा सज्जाचे तलाठी आऱएऩ गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़
या घटनेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी गायकवाड यांनी सांगितले़ अगोदरच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया रावसाहेब गिते यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़
आगीच्या घटना वाढल्या
४परभणी जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून, आठ दिवसांपासून आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे़ २० एप्रिल रोजी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील शेतशिवारात सायंकाळी आग लागून जनावरांसाठी ठेवण्यात आलेला ४ हजार कडबा जळून खाक झाला़
४सेलू तालुक्यातील वालूर येथे २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागून शेत आखाड्यावरील शेती उपयोगी साहित्य जळाले़ त्याच दिवशी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे वीज तारांचे घर्षण होऊन दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील झोपडीस आग लागून झोपडी पूर्णत: जळाली़ मागील दोन-तीन दिवसांपासून आगीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे़