परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:02 AM2019-11-21T00:02:29+5:302019-11-21T00:02:36+5:30

महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Parbhani: Two hundred bags of water pouch seized | परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही शहरात मात्र पाणी पाऊचची विक्री जोरात सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यावरुन आयुक्त रमेश पवार यांनी एका पथकाची स्थापना करुन तपासणी करण्याचे निर्देश दिले. मनपाचे पथक प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व विनय ठाकूर यांच्या पथकाने गंगाखेड रोडवरील एक्वा फाईन पाणी पाऊच कंपनीवर छापा टाकला. सेच डॉल्फिन अ‍ॅक्वा या ठिकाणी छापा टाकून पाणी पाऊचचे १५० पोती जप्त करण्यात आली.
शिवाय १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जुना मोंढा भागातील शेख इब्राहिम या पाणी विक्रेत्यावर आणि ताडकळसकर या देशी दारूच्या दुकानात छापा टाकून पाणी पाऊचची ४५ पोती जप्त करण्यात आली. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात करण गायकवाड, विनय ठाकूर यांच्यासह शेख रफीक, शेख इस्माईल, कदम आणि इतर दहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापुढे पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

Web Title: Parbhani: Two hundred bags of water pouch seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.