परभणी : जुन्या भांडणातून दोघांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:43 IST2019-01-13T00:42:59+5:302019-01-13T00:43:21+5:30
जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी रॉड व तलवारीने दोघांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धारखेड येथील गोदावरी नदी पात्रात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

परभणी : जुन्या भांडणातून दोघांवर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी रॉड व तलवारीने दोघांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धारखेड येथील गोदावरी नदी पात्रात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
गंगाखेडपासून जवळच असलेल्या धारखेड येथील सय्यद सलमान सय्यद युनूस व ब्रह्मानंद गायकवाड हे दोघे ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने गंगाखेड येथे जात होते. ते गोदावरी नदी पात्रात येताच धारखेड येथील मारोती देवराव चोरघडे, युवराज मुंजाजी चोरघडे, गणेश किशनराव चोरघडे, रोहन मंचक चोरघडे यांनी त्यांना थांबविले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ब्रह्मानंद गायकवाड यास लोखंडी रॉडने मारहाण केली. गायकवाड यांनी तेथून पळ काढला असता वरील चौघांनी सय्यद सलमान यासही लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सोन्याची अंगठी, लॉकेट असा अंदाजे १० हजार ५००० रुपयांचा ऐवज काढून घेतला.
या प्रकरणी सय्यद सलमान यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चौघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, संदीप पांचाळ तपास करीत आहेत.