परभणी: अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:44 AM2019-08-21T00:44:48+5:302019-08-21T00:45:30+5:30

गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत.

Parbhani: Two tractors seized by illegal sand traffickers | परभणी: अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर पकडले

परभणी: अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत.
पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत आहे. तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २० आॅगस्ट रोजी नायब तहसीलदार कैलास वाघमारे, किरण लांडगे, सचिन कडतन, विष्णू मुंढे, मंडळ अधिकारी गोवंडे, बिडवे, तलाठी सचिन शिंदे यांचे पथक दुचाकीने दुपारी या भागात दाखल झाले. त्यावेळी एम.एच.४४ डी. ००८२, एम.एच.४४/डी.१९६२, एम.एच.४४/डी. ९८३, एम.एच. २३/टी.५१४२, एम.एच.४४/ एस.७७३५, एमएच २२/एक्स ०३७१ आणि महिंद्रा डी.आय. हे सात ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळले. ही सातही वाहने जप्त करुन सायंकाळी ७ वाजता पाथरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

Web Title: Parbhani: Two tractors seized by illegal sand traffickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.