परभणी : अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पथकाने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:35 AM2017-12-23T00:35:15+5:302017-12-23T00:35:46+5:30

तालुक्यातील झोला शिवार परिसरातून विना परवाना वाहनातून अवैधरित्या वाळू भरुन त्याची वाहतूक करणारे दोन हायवा वाहने तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने पकडून गुरुवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी दोन चालक व मालक अशा तिघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

Parbhani: Two vehicles carrying illegal sand transport were caught by the squad | परभणी : अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पथकाने पकडली

परभणी : अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पथकाने पकडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील झोला शिवार परिसरातून विना परवाना वाहनातून अवैधरित्या वाळू भरुन त्याची वाहतूक करणारे दोन हायवा वाहने तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने पकडून गुरुवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी दोन चालक व मालक अशा तिघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकातील मंडळ अधिकारी उद्धव सरोदे, तलाठी शिवाजी मुरकुटे, सुरेश दिल्लोड, गणेश सोडगीर, अनिल पुरनाळे, नागू एरंडवाड, सुरेश भालेराव, दिलीप कासले यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळूने भरलेले हायवा ट्रक क्रमांक एम.एच.४६ एआर ३९६ व एम.एच.४६ एआर ७७९० झोला रस्त्याने येताना दिसल्याने पथकाने या वाहनातील चालकांना पावतीची विचारणा केली.
त्यांच्याकडे पावती नसल्याचे आढळून आल्याने ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली. चोरुन विना परवाना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी या वाहनधारकांना तहसील प्रशासनाने दंड भरल्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने उपविभागीय अधिकारी भोसले यांनी २२ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशावरुन मंडळ अधिकारी उद्धव सरोदे व तलाठी शिवाजीराव राठोड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध १ लाख ६५ हजार रुपयांची वाळू चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बीेट जमादार वसंतराव निळे, पोशि.मुख्तार पठाण हे करीत आहेत.

Web Title: Parbhani: Two vehicles carrying illegal sand transport were caught by the squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.