परभणी : वाळूची वाहतूक करणारी २ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:28 AM2019-01-02T00:28:15+5:302019-01-02T00:28:38+5:30
तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी खानापूरतर्फे झरी या ठिकाणी कारवाई केली. त्यावेळी चोरुन वाळूचा साठा करण्यात आला होता. या साठ्याजवळ एम.एच.२२, एन.१३७२ या क्रमांकाचा ट्रक आणि एक ट्रॅक्टर उभे होते. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. तसेच या ठिकाणी असलेला अंदाजे सहा ब्रास वाळूसाठाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर जाधव, मुंजाजी उसळे, लक्ष्मीकांत जाधव, परमेश्वर जोगदंड या चौघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार हनिफोद्दीन सय्यद तपास करीत आहेत.