परभणीतील प्रकार : पाण्याअभावी २० नेत्र शस्त्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:05 AM2019-02-14T00:05:59+5:302019-02-14T00:06:43+5:30

शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Parbhani type: 20 eye surgery canceled due to water failure | परभणीतील प्रकार : पाण्याअभावी २० नेत्र शस्त्रक्रिया रद्द

परभणीतील प्रकार : पाण्याअभावी २० नेत्र शस्त्रक्रिया रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील मुख्य नेत्र रुग्णालयात पाणी नसल्याने २० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया रद्द करण्याचा प्रकार बुधवारी घडला असून या प्रकाराबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना ना खंत ना गांभीर्य वाटत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार गेल्या अनेक काही महिन्यांपासून ढेपाळला आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या विविध यंत्र सामुग्री बंद असल्याने त्यांना खाजगी ठिकाणाहून सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्स-रे आदी काढून आणावे लागत आहेत. शिवाय काही औषधीही खाजगी दुकानातूनच आणाव्या लागत आहेत. यासंदर्भात सातत्याने ओरड होत असताना वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि लोकप्रतिनिधीही पाहण्यास तयार नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या गैरसोयीचा कळस बुधवारी नेत्र रुग्णालयातही गाठला गेला. शहरातील शनिवार बाजार भागात स्वतंत्ररित्या नेत्र रुग्णालय कार्यरत आहे. या नेत्र रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून हे रुग्ण सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी आले होते; परंतु, रुग्णालयात पाणीच नव्हते. त्यामुळे अधिकारीही फिरकले नाहीत. परिणामी येथील वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षाला कुलूप दिसून आले. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनी वैद्यकीय अधिकारी आता येतील, थोड्या वेळाने येतील म्हणून प्रतीक्षा केली; परंतु, कोणीही येत नसल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शहराध्यक्ष अरुण पवार, जनहित मदत केंद्राचे कुणाल गायकवाड, प्रेम आवचार यांना फोन केला. त्यानंतर ते दुपारी १ वाजेच्या सुमारास या रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांकडे चौकशी केली असता नेत्र रुग्णालयात महानगरपालिकेकडून पाणी उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याने बुधवारच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी मनपातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाºयांशी संपर्क साधला असता या विभागाचे कर्मचारी हरकळ यांनी नेत्र रुग्णालयाकडून पाण्याचे बिल मनपाला दिले जात नाही. यापूर्वीचेही बिल थकित आहे. जोपर्यंत नेत्र रुग्णालयातून पावती दिली जाणार नाही, तोपर्यंत पाण्याचे टँकर पाठवू नका, अशा लेखी सूचना नेत्र रुग्णालयातील अधिकाºयांनीच मनपाला दिल्या आहेत. बुधवारी टँकर हवे, अशी कोणतीही पावती मनपाकडे आली नाही. त्यामुळे बुधवारी पाण्याचे टँकर पाठविले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी या संदर्भात ‘लोकमत’कडे तक्रार केली. त्यानंतर सदर प्रतिनिधीने नेत्र रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले.
यावेळी उपस्थित पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रुग्ण मंदुबाई आश्रोबा वाघमारे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मी सकाळपासूनच शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आले आहे; परंतु, डॉक्टरच आले नाहीत, असे सांगितले. तर परभणीतील मुन्नाबी शेख नूर यांनीही शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात हजर झाले; परंतु, डॉक्टर आले नसल्याचे सांगितले. पालम तालुक्यातील चाटोरी येथील विश्वनाथ श्रीरंग गव्हाणे यांनीही यावेळी या रुग्णालयाची तक्रार केली.
दरम्यान, वैद्यकीय अधिकाºयाची बराचवेळ वाट पाहिल्यानंतर ते येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर दुपारनंतर हे रुग्ण निघून गेले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. वरिष्ठांचे लक्ष नाही. त्यामुळेच येथील अधिकारी बेजबाबदार झाल्याचा आरोप संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला आहे.
नेत्र रुग्णांची सातत्याने हेळसांड
शहरातील शनिवार बाजार भागात नेत्र रुग्णालय आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी दूर अंतरावरील जिल्हा रुग्णालयात जावे लागते.
४ दोन ते तीन वेळा त्यांच्या यासाठी चकरा होतात. यातून त्यांची बरीच हेळसांड होते. शिवाय वैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा परत जावे लागते, अशी प्रतिक्रिया येथील रुग्णांनी दिली.
नेत्ररोग तज्ज्ञ अर्चना गोरे यांचा प्रतिसाद नाही
या संदर्भात नेत्र रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अर्चना गोरे यांच्याशी दिवसभरात तीन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा चौथ्यांदा फोन केल्यानंतर त्यांनी मोबाईल घेतला; परंतु, या विषयासंदर्भात काहीही प्रतिक्रिया न देता फोन कट केला. त्यामुळे त्यांची या संदर्भातील भूमिका समजू शकली नाही.
रुग्णांवर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार - डाके
४या संदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारच्या शस्त्रक्रिया पाणी नसल्याने रद्द झाल्या असून त्या गुरुवारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Parbhani type: 20 eye surgery canceled due to water failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.