परभणी : जायकवाडीच्या पाणी आवर्तनाची अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:32 AM2018-11-26T00:32:47+5:302018-11-26T00:35:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी ( परभणी ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात ...

Parbhani: The uncertainty of the water cycle of the Jayakwadi | परभणी : जायकवाडीच्या पाणी आवर्तनाची अनिश्चितता

परभणी : जायकवाडीच्या पाणी आवर्तनाची अनिश्चितता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जिल्ह्याला खरीप आणि रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पाणी आवर्तन बंद करण्यात आले आहे. सध्या कालव्यातून खडका पात्रात परळी थर्मलसाठी पाणी वाहत आहे. धरणात ३० टक्के पाणीसाठा असल्याने परभणी जिल्ह्याच्या सिंचनासाठी पाणी आवर्तन कसे आणि किती मिळणार? याबाबत अद्याप अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.
पैठण येथे जायकवाडीच्या धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत मागील महिनाभर राज्य पातळीवर मोठे राजकारण आणि चर्चा सुरू होती. वरच्या धरणातील पाणी सोडण्यात आले असले तरी सध्या धरणात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
जायकवाडी धरण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान समजले जात असले तरी पाणी मिळविण्यासाठी विशेषत: परभणी जिल्ह्यातील शेतकºयांना नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. पाण्यासाठी अनेक वेळा राजकारणही झाले. जायकवाडी धरणाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड भागापासून सुरू होतो. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागातील बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली येते. पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यातील काही भाग येतो. या भागासाठी वॉटर लाईफ असलेल्या डाव्या कालव्यातून धरणे बांधतेवेळी २५०० क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्याचे निश्चित झाले होते. सध्या मात्र १२०० क्युसेसनेच पाणी मिळते. त्यामुळे पूर्वी बारामाही सिंचन होणाºया कालवा कार्यक्षेत्रात आता २५ टक्के सुद्धा सिंचन होत नाही. दिवसेंदिवस पाण्यासाठी शेतकरी आणि या भागातील ग्रामस्थांंना संघर्ष करावा लागत आहे.
परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मागील दोन महिने पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पाथरी तालुक्यात तर अधिकच बिकट परिस्थिती आहे.
पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी हे चार तालुके गंभीर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. याच आवर्तनात खरिपाच्या पिकासोबत रबी पेरणीसाठी पाणी सोडण्यात आले. पाथरी उपविभागांतर्गत ३५ हजार हेक्टर क्षेत्र असताना या पाणी आवर्तनामध्ये ५ हजार हेक्टर क्षेत्रत ओलिताखाली आले. सध्या सिंचनासाठी पाणी बंद करून परळी थर्मलसाठी खडका डोहात पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आणखी सात महिने उन्हाळा आहे. त्यामुळे आगामी काळात चार पाणीपाळ्या सोडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही नियोजन झाले नाही.
कालवा सल्लागार समिती : बैठकीला खो
४जायकवाडी धरणात ३० टक्के पेक्षा कमी पाणी आहे. परभणी जिल्ह्याला पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणातून किती पाणी सोडावे, यासाठी राज्यस्तरावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येतो.
४दरवर्षी १५ आॅक्टोबरनंतर होणारी बैठक नोव्हेंबर महिना संपत आला तरीही झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
परभणी जिल्ह्यात विशेषत: पाथरी मतदार संघात गंभीर दुष्काळ पडल्याने शेतकºयांच्या हितासाठी जायकवाडी धरणातील पाणी सिंचन तसेच पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
-मोहन फड, आमदार, पाथरी

Web Title: Parbhani: The uncertainty of the water cycle of the Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.