परभणी : विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:07 AM2019-06-13T00:07:45+5:302019-06-13T00:08:05+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरविरुद्ध महसूल पथकाने कारवाई केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरविरुद्ध महसूल पथकाने कारवाई केली आहे़
तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातील दुसलगाव व चिंचटाकळी येथील दोन धक्क्यांचे लिलाव झाले आहेत़ इतर ठिकाणच्या वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसताना या ठिकाणावरून राजरोजपणे वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे़ गोदावरी नदीपात्रातून दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळा वाळुची चोरी केली जात असून, अनेक वेळा वाळू वाहतुकीतून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत़ ९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी नितीन भंडारे, चंद्रकांत साळवे यांचे पथक महातपुरी परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता, नदीपात्रा जवळील खंडोबा मंदिर परिसरात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच २२ एडी-१५३८) मिळून आला़ तर ११ जून रोजी तलाठी चंद्रकांत साळवे व विनोद मुळे यांनी मसला परिसरात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला़ हे दोन्ही ट्रॅक्टर गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत़
तालुक्यातील गौंडगाव येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला नसतानाही गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा केला जात असल्याबद्दल ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्याने १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश चव्हाण, मंडळ अधिकारी शंकर राठोड, विनोद मुळे, चंद्रकांत साळवे, नितीन भंडारे यांच्या पथकाने या नदीपात्रातून वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले़
तीन दिवसांत चार ट्रॅक्टर पकडले
४गंगाखेड येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई सुरू केली आहे़
४९ जून ते १२ जून या तीन दिवसांमध्ये एकूण चार वाहनांविरूद्ध तहसील प्रशासनाने कारवाई केली़ यामुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत़
४तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव झालेले नसतानाही अवैधरित्या वाळूची चोरी केली जात आहे़ वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे़