परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:19 AM2018-05-25T00:19:33+5:302018-05-25T00:19:33+5:30

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़

Parbhani: Under 48 thousand hectare land under irrigation | परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़
परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलाढाली कृषी हंगामावर अवलंबून आहेत़ जिल्ह्यात खरीप आणि रबी या दोन हंगामात पिके घेतली जातात़ खरीप हंगामातील पिके मोसमी पावसावर अवलंबून असतात तर रबी हंगामातील पिकांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतात़ जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे़ पाथरी तालुक्यातील वरखेड येथून डाव्या कालव्याला सुरुवात होते़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळते़ तर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांना उजव्या कालव्यातून जायकवाडीचे पाणी उपलब्ध होते़ जायकवाडी प्रकल्प हा परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे़ जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांसाठी हमखास जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जात़े़ मात्र मागील सहा वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा असल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामात धोक्यात आला होता़ ५ ते ६ वर्षांपर्यंत जिल्ह्याला पाणी मिळाले नाही़
मागील वर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी जायकवाडी प्रकल्प मात्र १०० टक्के भरला़ त्यामुळे परभणी जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका आणि चाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांना पाणी उपलब्ध होते़ यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने कालव्यांना आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत होती़ या मागणीनुसार पाणी पाळयांचे नियोजन करण्यात आले़ रबी हंगामामध्ये ४ पाणी पाळया देण्यात आल्या आणि त्याचा फायदा रबीच्या पिकांना झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर ४८ हजार ५०० हेक्टर जमिनीवर सिंचन झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार हेक्टर सिंचन वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ रबी हंगामासाठी प्रथमच पूर्ण क्षमतेने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा़, ज्वारी, कापूस या पिकांना लाभ झाला़ जायकवाडीच्या पाण्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी पेरण्यांचे नियोजन केले होते़ अपेक्षेप्रमाणे प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़
उन्हाळी हंगामातही मिळाले पाणी
जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही यावर्षी पाणी उपलब्ध झाले आहे़ पाटबंधारे विभागाने उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी तीन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या आहेत़ येत्या काही दिवसांत शेवटची पाणी पाळी देखील जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे़ उन्हाळी हंगामात सर्वसाधारपणे १० हजार हेक्टरपर्यंतच सिंचन होते़ परंतु, पाटबंधारे विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंचनात वाढ झाली असून, उन्हाळी हंगामातील पिकांसाठी २५ हजार हेक्टरवर जायकवाडीचे पाणी उपलब्ध झाले आहे़ हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़

Web Title: Parbhani: Under 48 thousand hectare land under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.