परभणी: कीड, रोगांचे बारकावे समजून घ्या - अशोक ढवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:22 PM2019-07-20T23:22:42+5:302019-07-20T23:23:48+5:30

दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़

Parbhani: Understand pests, diseases and diseases - Ashok Dhavana | परभणी: कीड, रोगांचे बारकावे समजून घ्या - अशोक ढवण

परभणी: कीड, रोगांचे बारकावे समजून घ्या - अशोक ढवण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़
कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ़ ढवण बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी़जी़ मुळे, प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले, डॉ़ पी़ आऱ झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती़
यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील लष्करी अळी या पिकांच्या व्यवस्थापनावर विद्यापीठाने भर दिला आहे़ लवकरच विद्यापीठ विकसित अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे बीटीमध्ये परावृत्तीत करण्यासाठी महाबीजसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे, असे कुलगुरुंनी सांगितले़
दोन दिवसांच्या या परिषदेत डॉ़ डी़जी़ मोरे, डॉ़ ए़जी़ बडगुजर, डॉ़ पी़ आऱ झंवर, डॉ़ एस़डी़ बंटेवाड, डॉ़ डी़व्ही़ आसेवार, डॉ़ एस़डी़ धुरगुडे, डॉ़ टी़एच़ घंटे, प्रा़ अरविंद पंडागळे आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़

Web Title: Parbhani: Understand pests, diseases and diseases - Ashok Dhavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.