परभणीतील उपक्रम: पथनाट्यातून सावित्रींच्या विचारांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:14 AM2019-01-03T00:14:06+5:302019-01-03T00:14:41+5:30
येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध्यामातून केला जाणारा हा जागर आता चळवळीचे रुप घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध्यामातून केला जाणारा हा जागर आता चळवळीचे रुप घेत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाºया सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचून मुलींनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, या उद्देशाने येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेने २००१ पासून सावित्रीबाई फुले महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. त्यात पथनाट्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे, एका शाळेने सुरू केलेला हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता आता चळवळीचे रुप धारण करीत आहे. महिलांचे हक्क, स्त्री शिक्षण, हुंडाबळी, भारतीय संविधान अशा विषयांना हात घालत पथनाट्यातून जनजागृती केली जात आहे. २० विद्यार्थिनींचा संच यासाठी तयार केला जातो. शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्याबरोबरच ग्रामीण भागातही पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. सावित्रीबाई फुले यांची जयंती ते माता जिजाऊ यांची जयंती या काळात प्रामुख्याने पथनाट्यांचे सादरीकरण केले जाते. सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील शिक्षक यशवंत मकरंद हे पथनाट्याचे लेखन करतात. या उपक्रमाला आता व्यापक रुप मिळाले असून, सुनील ढवळे पथनाट्याचे दिग्दर्शन करीत आहेत. तर नागेश कुलकर्णी, रवि पुराणिक, प्रकाश पंडित, त्र्यंबक वडसकर, प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य पांडुरंग पांचाळ, सुभाष जोगदंड अशी विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन पथनाट्याची चळवळ राबवित आहेत. सावित्रीबाई फुले यांचे विचार तळागाळापर्यंत नेऊन खºया अर्थाने त्यांना अभिवादन करण्याचा हा वसा यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवण्याचा निर्धार संयोजकांनी बोलून दाखविला.
सावित्रींच्या लेकींचा सन्मान
४समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया सावित्रींच्या लेकींचा सन्मानही सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या वतीने केला जातो. यावर्षी देखील हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात एड्सग्रस्तांसाठी काम करणाºया संपदा सुधांशू देशमुख, महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी अरुणा लोंढे, चंद्राबाई शिंदे, शांताबाई जोंधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
४सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणाºया या कार्यक्रमास महापौर मीनाताई वरपूडकर, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, शिक्षणाधिकारी वंदना वाव्हूळ, मनपाच्या उपायुक्त विद्याताई गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
नाटक, परिसंवादही...
४सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नाटक, परिसंवाद, प्रभातफेरी, भित्तीपत्रके, मुलींसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धाही घेतल्या जातात.