परभणी : दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:03 AM2019-02-21T00:03:51+5:302019-02-21T00:05:01+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची युद्ध स्तरावर धावपळ सुरू आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे एकूण ६० कर्मचारी तालुक्यातील गावनिहाय कुटुंबाची यादी तयार करीत असून तहसील कार्यालयात यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
२० फेब्रुवारीपर्यंत गावातील दीड हजार कुटुंबांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नियुक्त कर्मचारी तहसील कार्यालयात तळ ठोकून आहेत.
शेतकºयांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेबु्रुवारी रोजी घेतला. शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे व आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. २ हेक्टरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात ३ टप्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. याचा पहिला हप्ता मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात जमा केला जाणार आहे. दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जूनमध्ये दिला जाणार आहे. तालुक्यात ही योजना राबविण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला नोंदणी करताना अनेक नियम व अटी असल्याने कुटुंबांची व्याख्या ठरविणे कठीण होऊन बसले होते. अनेक अधिकारी व कर्मचारी पात्र, अपात्र निकषाबाबत गोंधळून गेले होते. त्यातच शासनाच्या परिपत्रकात दररोज बदल होत असल्याने अधिकाºयांची चांगलीच दमछाक उडाली होती. यामुळे ही योजना पात्र, अपात्रतेच्या घोळात अडकून बसते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र सर्व अडथळे पार करून सरते शेवटी केंद्र सरकारच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार केला असून तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय या तीनही कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून आहेत. २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील १४ गावातील दीड हजार शेतकºयांची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
काम युद्धस्तरावर सुरू
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून मार्च महिन्यात कधीही अचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने शेतकºयांच्या खात्यात पहिला हप्ता जमा व्हावा, यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांना तातडीने माहिती अपलोड करण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी दौरा करीत आहेत. मानवत तहसील कार्यालयात माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून २० फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी कोळी यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती घेतली. एकूणच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.