परभणी : वाळू तस्करीसाठी आता बैलगाडीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:52 AM2019-05-13T00:52:12+5:302019-05-13T00:52:50+5:30
ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणे धोकादायक झाल्याने वाळूमाफियांनी आता तस्करीसाठी चक्क बैलगाडीचा वापर सुरू केला आहे. हा नवा फंडा वापरत दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असताना महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे.
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळूचे २२ धक्के आहेत. यावर्षी गोदावरीचे वरचे टोक नाथ्रा ते मुदगलपर्यंत केवळ एका वाळू धक्याचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित वाळू धक्यातून अवैध उपसा सुरू आहे.
महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करीत आहे. रस्त्यावरून जाणारी ही वाहने पकडून हजारो रुपयांचा दंड लावला जात आहे. त्यामुळे वाळूमाफियांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाहनांवर वारंवार कारवाई होत असल्याने वाळूमाफियांनी आता नवीन शक्कल शोधली आहे. त्यात बैलगाडीचा वापर केला जात आहे. वाळूघाटांवरून बैलगाडीच्या सहाय्याने वाळू आणायची, या वाळूचा साठा करायचा आणि तेथून वाटेल तेथे ही वाळू घेऊन जायची. मागील काही महिन्यांपासून अशा पद्धतीने वाळूची तस्करी जोरात सुरू आहे; परंतु, महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाळूची सर्रास चोरी सुरू असल्याचे दिसत आहे.
जुन्या पद्धतीला नवा मुलामा
च्१५ ते २० वर्षापूर्वी ज्यांना बांधकाम करावयाचे आहे, असे व्यक्ती गोदाकाठच्या गावात जाऊन बैलगाडी किंवा गाढवावर वाळू आणत होते. मध्यंतरीच्या काळात अशा पद्धतीने वाळू आणणे खर्चीक झाल्याने ही पद्धत बंद झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर पुन्हा दिसू लागला आहे.
च्गोदावरी पात्रातून वाहनाने वाळू चोरणे अडचणीचे ठरत असल्याने बैलगाडीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सूर्योदयापासून वाळू उपसण्याला सुरूवात होत असून ही वाळू गावाबाहेर साठा करून ठेवली जाते. तेथे विक्री करण्याचा व्यवसाय सध्या सुरू आहे. नदीपात्रातील वाळू उपसण्यासाठी बैलगाडीचालक १५० ते २०० रुपये घेतात. विशेष म्हणजे, बैलगाडी व गाढवावरून वाळू वाहतूक करताना कोणी रोखत नाही. त्यामुळे हा उपसा बिनबोभाटपणे सुरू आहे.
नियमबाह्यपद्धतीने होतेय वाळूचे उत्खनन
च्मागील काही वर्षांपासूून वाळू धक्क्याच्या लिलावात पुढाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. वाळू व्यवसायातून करोडो रुपयांची माया जमविली जात आहे. नियमबाह्यउपसा केल्याने पात्रात मोठे खड्डे पडले असून उन्हाळ्यात पाणीसाठा होत नाही. मागील दोन वर्षात वाळूचे दर गगनाला भिडले आहेत.
च्त्यामुळे बांधकाम करणे शक्य नाही. गोपेगाव आणि डाकू पिंपरी या दोन धक्यांचा लिलाव झाला असून त्यातून प्रचंड वाळू उत्खनन होत आहे. दिवसा मजुरांच्या सहाय्याने आणि रात्री यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र याविरुद्ध कारवाई होत नाही.
अधिकाºयांवरच नजर
कारवाईच्या धास्तीने वाळू चोरी कमी झाली असली तरी वाळू तस्करी करणारे महसूल विभागाच्या अधिकाºयांवर नजर ठेवून तस्करी करीत आहेत.
अधिकाºयांच्या निवासस्थानासमोरच पाळत ठेवली जात असून गाडी कोणत्या दिशेने जाते, त्यावरून वाळू तस्करीचा वेळ ठरविला जात आहे. त्यामुळे अधिकाºयांची कारवाई अनेक वेळा निष्फळ ठरते.