परभणी: मुख्याधिकाऱ्यांअभावी खोळंबली पूर्णेतील कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:21 PM2019-07-04T23:21:33+5:302019-07-04T23:23:45+5:30
येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे.
येथील तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या बदलीनंतर पूर्णा नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाला नाही. मागील आठ महिन्यांपासून पालम नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक केरूळकर यांच्याकडे पूर्णा नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार आहे. पालम व पूर्णा या दोन कार्यालयाचा कारभार एकाच अधिकाºयाकडे असल्याने दोन्ही पैकी एकाही कार्यालयाला ते पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. परिणामी पूर्णा नगरपालिकेमार्फत होणारी विकासकामे, दैनंंदिन व्यवहार, पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेतील कामे ठप्प पडली आहेत. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तेव्हा कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
स्वच्छतेची कामे ठप्प
४पूर्णा शहरात सध्या स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. सकाळी गल्लीबोळातून फिरणाºया घंटागाड्यांचा आवाज बंद झाला आहे.
४दिवसभरातून एखादी घंटागाडी शहरात फिरताना पहावयास मिळत आहे. शहरात नियमित स्वच्छताही होत नाही. त्यामुळे स्वच्छतेअभावी शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.