परभणी : श्री विसर्जनासाठी जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:20 AM2018-09-23T00:20:46+5:302018-09-23T00:22:05+5:30
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता होत असून, जिल्हाभरात विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत़ गणेश विसर्जनाच्या काळात पर्यावरणाचा समतोल रहावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शनिवारीच तयारी केली आहे़
परभणी शहरात महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात श्री विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आला असून, गणेश मंडळांनी या ठिकाणीच श्रींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून, शनिवारी ठिक ठिकाणी पथसंचलन करण्यात आले़ १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्हाभरात श्रीगणरायांचे थाटात आगमन झाले़
जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ या काळात पोलीस प्रशासनाने नियोजन करीत कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राखले.
दहा दिवसांच्या या उत्सवाची रविवारी सांगता होत असून, गणरायाला निरोप देताना गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ शनिवारपासूनच श्री विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी ठिक ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले़ परभणी शहरामध्ये श्री विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे़ येथील वसमत रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात विसर्जनासाठी हौद बांधण्यात आला आहे. ५० बाय ५० फुटांचा हा हौद १८ फुट खोल असून, या हौदातच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन महापलिकेने केले आहे़
पाणीपुरवठा अभियंता शेख इस्माईल यांनी सांगितले, मागील चार-पाच वर्षांपासून मनपाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे़ जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये गणेश मंडळांची गर्दी होऊ नये, या दृष्टीने गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी येण्याचा व जाण्याचा स्वतंत्र रस्ता केला आहे़ त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार असून, पोलिसांचा पुरेसा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे़ तेव्हा गणेश भक्तांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
गणेश मूर्ती : संकलनाचा उपक्रम
श्री गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी महापालिकेने शहरातील विविध भागात गणेश मूर्ती संकलनाची सुविधा केली आहे़ नागरिकांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती प्रभाग समिती अ अंतर्गत जिंतूर रोडवरील गणपती चौक येथे आणून ठेवावेत, तसेच प्रभाग समिती ब अंतर्गत क्रांती चौक, दर्गा रोड परिसरासाठी कृत्रिम रेतन केंद्र या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे़ प्रभाग समिती क अंतर्गत काळी कमान, देशमुख हॉटेल या ठिकाणी संकलन केले जाणार आहे़ नागरिकांनी मनपाच्या संकलन केंद्रातच गणेश मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे, उपमहापौर माजू लाला, सभापती सुनील देशमुख, आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे़
राहटी येथे पोलिसांचा बंदोबस्त
वसमत रस्त्यावरील राहटी बंधाºयात यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते़ राहटी बंधाºयात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मागील तीन वर्षांपासून प्रतिबंध करण्यात आला आहे़ त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, विसर्जनासाठी जलशुद्धीकरण केंद्राची जागा निश्चित करण्यात आली आहे़
२००० अधिकारी, कर्मचारी नियुक्ती
परभणी- गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला असून, सुमारे २ हजार अधिकारी आणि कर्मचाºयांची बंदोबस्त कामी नियुक्ती केली आहे़ शहरामध्ये ठिक ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले आहेत़ त्याचप्रमाणे संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्तही लावला आहे़ रविवारी गणरायांना निरोप देण्यासाठी शहराच्या विविध भागातून विसर्जन मिरवणुका काढल्या जातात़ ढोल-ताशांच्या गजरात निघणाºया या मिरवणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरामध्ये बंदोबस्त वाढविला आहे़