परभणी : पाच गावांतील ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:29 AM2018-11-28T00:29:59+5:302018-11-28T00:30:14+5:30

तालुक्यातील आडगाव बाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ५ गावांना अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले़ ही घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़

Parbhani: Village dwellers of five villages | परभणी : पाच गावांतील ग्रामस्थांचा ठिय्या

परभणी : पाच गावांतील ग्रामस्थांचा ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यातील आडगाव बाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ५ गावांना अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने या गावातील ग्रामस्थांनी ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले़ ही घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत टाकळखोपा, भुसकवडी, श्रीरामवाडी, कामठा, सावळी तांडा इ. गावांना मागील ३ ते ४ महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे़ त्यामुळे कृषीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे़ केवळ सहा तास कृषीपंपांना वीजपुरवठा होतो़ मात्र तीन तासही वीज मिळत नसल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़
या बाबत या गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी महावितरणकडे तक्रारी करूनही फारसा फरक पडला नाही़ २३ नोव्हेंबर रोजी या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता़ परंतु, तो सुरळीत न झाल्याने टाकळखोपा, श्रीरामवाडी, कामठा, भुसकवडी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी २७ नोव्हेंबर रोजी ३३ केव्ही उपकेंद्राला कुलूप ठोकले़ त्यानंतर या ३३ केव्ही उपकेंद्रासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले़
खाजगी हेल्पर घालतात वाद
४या फिडरवर लाईनमनपेक्षा खाजगी हेल्परच कारभारी आहेत़ आपापसातील वाद, देवाण-घेवाण व मतभेदातून कुठले गाव केव्हाही बंद करतात, नव्हे तर लाईन ड्रिप करणे, दाब कमी करणे हे काम हेल्पर करीत असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाला आहे़ महावितरण मात्र याबाबत गंभीर नसल्याने विजेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

Web Title: Parbhani: Village dwellers of five villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.