परभणी : अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:11 AM2018-09-13T00:11:51+5:302018-09-13T00:12:25+5:30

बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

Parbhani: Villagers' complaint of misappropriation of subsidy | परभणी : अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार

परभणी : अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकºयांना अनुदानाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन टप्प्यात अनुदान वाटप करण्यात आले.
दरम्यान, हे अनुदान वाटप करीत असताना काही शेतकºयांवर अन्याय झाल्याने बुधवारी परभणी तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले.
भोगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी काही शेतकºयांचे नुकसानीचे क्षेत्र कमी असतानाही ते वाढवून दाखविले आहे. तर ज्यांचे क्षेत्र अधिक आहे, त्यांना कमी क्षेत्र दाखविले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानाच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी पं.स.सदस्य दिलीप साबळे, माणिक साबळे, उत्तम साबळे, हनुमान साबळे, किशनराव साबळे, उत्तम रासवे यांच्यासह ५० ते ६० शेतकºयांंनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे भोगाववासियांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Parbhani: Villagers' complaint of misappropriation of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.