परभणी : वीजप्रश्नी शिवसेनेचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:36 AM2018-11-20T00:36:26+5:302018-11-20T00:36:43+5:30
शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला.
विजेच्या प्रश्नावर सातत्याने महावितरणच्या कामकाजावर विविध राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या संदर्भात महावितरण कार्यालयात आंदोलन होण्याची प्रकरणे वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक व शेतकरी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.
यावेळी खा.जाधव यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना शेतकºयांना अखंडित वीज पुरवठा व विद्युत रोहित्राच्या प्रश्नावरुन धारेवर धरले. यावेळी अधीक्षक अभियंता जाधव यांनी निधीची अडचण सांगितली. त्यानंतर खा.जाधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला व जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी या संदर्भात महावितरणच्या अधिकाºयांना मुंबई येथे बैठकीसाठी बोलाविले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणकडून शेतकºयांची अडवणूक होत असेल तर शिवसैनिक ते सहन करणार नाहीत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाºयांनी शेतकºयांची गैरसोय होऊ देऊ नये, असा सज्जड इशाराही खा.जाधव यांनी दिला.
परभणी शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक, शेतकरी, अधिकाºयांची उपस्थिती होती. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.