परभणी : विटा गाव ४ दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:08 AM2019-06-08T00:08:37+5:302019-06-08T00:08:59+5:30
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.
पाथरी तालुक्यात ४ दिवसांपूर्वी जोरदार वादळी वारे आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने अनेक गावातील विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्या आहेत. परिणामी वीज गायब झाली आहे. तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून विटा बु. गावाला वीज पुरवठा होतो. मात्र वादळी वाºयाने या वाहिनीत बिघाड झाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. गावात वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
वीज वितरण कंपनीकडे तक्रार करून ही दुरुस्तीची कामे हाती घेतले जात नसल्याची तक्रार येथील सरपंच शिवाजी हारकाळ यांनी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चार दिवसांपासून अंधारात असलेल्या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सोनपेठ तालुक्यातील ग्रामस्थ विजेच्या लपंडावाने झाले त्रस्त
४सोनपेठ- शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा तीन दिवसानंतरही सुरळीत झाला नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
४यावेळी वादळी वाºयाने तालुक्यातील वीजपुरवठा बंद झाला होता. चार दिवसांपासून तालुक्यातील वीजपुरवठा खंडित असतानाही महावितरणने अद्याप हा वीजपुरवठा सुरळीत केला नाही. चार दिवसांपासून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
४वीजपुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.