परभणी : सरपंचांनी करून पाहिले व्हीव्हीपॅटवर मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:54 AM2018-12-30T00:54:04+5:302018-12-30T00:54:33+5:30
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़
जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅटद्वारे मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यात येत आहे़ याचाच एक भाग म्हणून शनिवारी परभणीत कार्यक्रम घेण्यात आला़ नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ गावांतील सरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आयोजित केली होती़ या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी आगामी निवडणुकीत वापरण्यात येणाºया ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची उपस्थितांना माहिती दिली़ त्यानंतर उपस्थित सरपंचांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले़ तसेच केलेले मतदानही व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पडताळले़ यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही निवडणूक विभागाकडून देण्यात आली़ यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे, डॉ़ आळसे, जि़प़चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, यशदाचे कार्यकारी संचालक सुमन पांडे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, पी़पी़ वानखेडे, पोहेकर, नालंदे, भराडे आदींची उपस्थिती होती़