परभणी : ३० केंद्रांतील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:16 AM2019-04-30T01:16:04+5:302019-04-30T01:16:28+5:30

लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर मतदार संघातील ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची चिठ्ठ्यांची मोजणी करून ती मतदानाशी पडताळून घेतली जाणार आहे़

Parbhani: VVPAT count in 30 centers will be counted | परभणी : ३० केंद्रांतील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

परभणी : ३० केंद्रांतील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर मतदार संघातील ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची चिठ्ठ्यांची मोजणी करून ती मतदानाशी पडताळून घेतली जाणार आहे़
यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आली होती़ मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर कोणाला मतदान झाले याची चिठ्ठी ७ सेकंदापर्यंत पाहता आली़ त्यानंतर ही चिठ्ठी मशीनला जोडलेल्या ट्रेमध्ये जमा झाली आहे़ प्रत्येक मतदान केंद्रवर व्हीव्हीपॅट यंत्रणा कार्यान्वित होती़ मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता मतमोजणीचे वेध लागले आहेत़ २३ मे रोजी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे़ या मतमोजणी दरम्यान व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार का? होत असेल तर ती कशी होणार? या विषयी उमेदवारांसह मतदारांनाही उत्सुकता लागली आहे़ दरम्यान, व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र काढले असून, त्यानुसार लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत़ हे मतदान केंद्र रँडम पद्धतीने निवड करावयाचे आहेत़ ईव्हीएम मशीनचे मतदान मोजणी झाल्यानंतर निवडलेल्या ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार अूसन, त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या मतदानाशी पडताळणी केली जाणार आहे़ परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ या प्रमाणे ३० केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली़
उमेदवारांत उत्सुकता
४यंदा व्हीव्हीपॅटचा वापर झाला असून, व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मोजणी होणार असल्याने याविषयी उत्सुकता लागली आहे़

Web Title: Parbhani: VVPAT count in 30 centers will be counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.