परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:29 AM2019-09-09T00:29:11+5:302019-09-09T00:29:54+5:30

महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़

Parbhani: Waiting for agriculture subsidy for 6 years | परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

परभणी:५ वर्षांपासून कृषीपंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महावितरण आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांपासून केवळ जोडणीला मंजुरी मिळाली; परंतु, साहित्य मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ परंतु, अद्यापही जवळपास ८ हजार लाभार्थी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे़
प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीजपुरवठा मिळावा, या उदात्त हेतुने २०१२ मध्ये महावितरण आपल्या दारी ही योजना वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात आली़ महावितरणच्या १० उपविभागांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी वीज जोडणीसाठी अर्ज करताच त्यांचा अर्ज मंजूर करून वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने केले होते. प्रत्यक्षात केवळ कोटेशन भरण्यात आले आणि जोडणी देताना मात्र मुख्य वाहिनीपासून शेतकºयांच्या शेतापर्यंत खांब टाकणे, तारा ओढणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी उदासिनता दाखविली़ या योजनेत सहभागी शेतकºयांनी मुख्य खांबापासून आपल्या कृषीपंपापर्यंत लागणाºया केबलचा खर्च स्वत: उचलून तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे़
परभणी जिल्ह्यात ४ वर्षामध्ये ८ हजार ३७३ शेतकºयांनी महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत कृषीपंपासाठी वीज मिळावी म्हणून अर्ज केले होते़ या सर्व शेतकºयांचे अर्ज मंजूर करून प्रती शेतकरी अंदाजे ५ ते ६ हजार रुपयांचे कोटेशन भरून घेतले होते़
त्यामुळे या योजनेतून साधारणत: ५ कोटी रुपयांचा निधी महावितरणच्या खात्यावर जमा झाला़ मात्र वीज जोडणी घेण्यासाठी शेतकºयांना कोणतेही साहित्य न दिल्यामुळे मागील पाच वर्षापासून कृषीपंप धारकांना वीज जोडणी मिळाली नाही़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमधून महावितरणच्या कारभाराविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़
इतर योजनेतून लाभ दिल्याचा कांगावा
च्महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत परभणी शहर वगळता १० उपविभागांतर्गत ८ हजार ३७३ कृषीपंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला होता़ यामध्ये गंगाखेड उपविभागांतर्गत ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८३, सोनपेठ ५१३, पालम ५४६ आणि मानवत उपविभागांतर्गत ४११ लाभार्थी शेतकºयांनी या योजनेत प्रस्ताव दाखल केले होते़
च्पाच वर्षानंतर वीज वितरण कंपनीने या शेतकºयांना कोणतेही साहित्य दिले नाही़ उलट हे लाभार्थी शेतकरी पाच वर्षापासून महावितरणकडे साहित्य मिळावे यासाठी खेटे मारत आहेत़ मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना व उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली आहे़
च्या योजनेतून महावितरण आपल्या दारीमधील लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे़ परंतु, या योजनेत लाभ घेण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड या शेतकºयांना सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकºयांनी या दोन्ही योजनेकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे़

Web Title: Parbhani: Waiting for agriculture subsidy for 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.