परभणी : बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:16 AM2018-07-29T00:16:04+5:302018-07-29T00:16:28+5:30
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत येणाऱ्या लोणी, कानसूर, लिंबा तांडा येथील शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान अद्याप जमा न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंबा (्परभणी): पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत येणाऱ्या लोणी, कानसूर, लिंबा तांडा येथील शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान अद्याप जमा न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पाथरी तालुक्यातील बाभुळगाव, लोणी, कानसूर, तारूगव्हाण, डाकूपिंपरी, लिंबा, लिंबा तांडा, फुलारवाडी आदी परिसरात शेतकºयांनी गतवर्षी कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते; परंतु, बोंडअळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना अनुदान जाहीर केले आहे. यातील बाभुळगाव, डाकू पिंपरी, फुलारवाडी येथील शेतकºयांना १ कोटी २२ लाख रुपयांचे बोंडअळीचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती शाखाधिकारी एस.एस. मगर यांंनी दिली. मात्र लिंबा तांडा, लोणी, कानसूर या गावांचे अनुदान बँकेला प्राप्त झाले नसल्याने शेतकरी बँकेमध्ये चकरा मारीत आहेत.