परभणी : कुºहाडी गावाला जलयुक्त शिवारच्या कामांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:26 AM2018-03-11T00:26:58+5:302018-03-11T00:27:03+5:30

जिंतूर तालुक्यातील कुºहाडी या गावाचा २०१६-१७ या वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला होता. या कामांसाठी आराखडा तयार करण्यात आला होता; परंतु, अद्याप या आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्याने कुºहाडी येथे जलयुक्त शिवारची कामे केव्हा होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Parbhani: Waiting for the work of the water tank of the poor village | परभणी : कुºहाडी गावाला जलयुक्त शिवारच्या कामांची प्रतीक्षा

परभणी : कुºहाडी गावाला जलयुक्त शिवारच्या कामांची प्रतीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहाडी (जि. परभणी): जिंतूर तालुक्यातील कुºहाडी या गावाचा २०१६-१७ या वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला होता. या कामांसाठी आराखडा तयार करण्यात आला होता; परंतु, अद्याप या आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्याने कुºहाडी येथे जलयुक्त शिवारची कामे केव्हा होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये २०१६-१७ मध्ये २७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे घोषित करण्यात आले. त्यात कुºहाडी गावाचा समावेश होता. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीसाठीही जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु, दोन वर्षाची मुदत संपूनही या आराखड्यानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले नाहीत व यातील कामांनाही मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे कुºहाडी येथे जलयुक्तची कामे होणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जलयुक्त शिवारची कामे दोन वर्षाच्या आत केली नसल्यास मुदत संपून जाण्याची भिती आहे. शासनाच्या वतीने जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य दिले जात असताना येथील या कामांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनाच या योजनेतील कामांची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे या कामापासून ते अनभिज्ञ आहेत, अशी माहिती ग्रा.पं. सदस्या कमलबाई वाव्हळे यांनी दिली.
दोन वर्षापासून बंधाºयाची कामे रखडली
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण विभागाच्या वतीने दोन सिमेंट बंधाºयाची कामे मंजूर झाली आहेत. यासाठी निविदाही निघाल्या होत्या. वर्षभराचा कालावधी उलटला तरी बंधाºयाची कामे हाती घेण्यात आली नाहीत. यामुळे गावातील विकासावर त्याचा परिणाम होत असून बंधाºयाची कामे लवकर करावीत, अशी मागणी होत आहे.

कुºहाडी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणाºया कामाची पाहणी करुन ते तात्काळ कामे केली जातील.
-शांताराम वाकळे, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Parbhani: Waiting for the work of the water tank of the poor village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.