परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:35 AM2018-12-01T00:35:56+5:302018-12-01T00:36:22+5:30

वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.

Parbhani: Water from eight bighas of electricity on electricity bills | परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

googlenewsNext

मोहन बोराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.
निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. या योजनेचे पंपहाऊस देवला (ता. परतूर जि.जालना) येथे आहे. तर जलशुद्धीकरण केंद्र सेलू तालुक्यातील रवळगाव येथे आहे. पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचे जवळपास १२ लाख रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने पाच महिन्यापूर्वीच दोन ठिकाणची वीज तोडली.
दरवर्षी टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, देऊळगाव, डासाळा, आहेरबोरगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, म्हाळसापूर, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व जलस्त्रोत कोरडे पडले. परिणामी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय गावांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने आठही गावातील ग्रामपंचायतींनी योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक गावात चार ते पाच दिवसांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरून दिले जात आहे.
केवळ थकित वीज बिलावर महावितरण आडूून बसल्याने दुधनात पाणी असूनही आठ गावे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही थकित वीज बिलावरून योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ं
आठ गावातील ग्रामपंचायतींनी निम्मे थकित वीज बिल चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींनी ५० हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. धनादेश देखील एकत्र केले आहेत. टंचाई लक्षात घेऊन प्रशानसाने थकित वीज बिलाचा दंड आकारू नये. तसेच निम्या रक्कमेवर पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करावी
-कैलास मोगल, सरपंच कुंडी

Web Title: Parbhani: Water from eight bighas of electricity on electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.