परभणी : राजकीय स्वार्थासाठी पळविले पाणी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:19 AM2018-12-24T01:19:58+5:302018-12-24T01:20:20+5:30
तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी ) : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.
पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा हा नांदेडच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा प्रत्यय वारंवार शेतकºयांना येत आहे. या बंधाºयासाठी स्थानिक शेतकºयांची शेती पाण्याखाली गेली आहे. पाणी मात्र नांदेडसाठी सोडले जात आहे. २२ डिसेंबर रोजी चार तासात २० दलघमी पाणी देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडसाठी ६८ टक्के तर पालम तालुक्यासाठी ३२ टक्के तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील निष्क्रिय पुढाºयांमुळे या आरक्षणात अजूनही बदल झालेला नाही. विष्णुपुरी बंधाºयात मुबलक पाणीसाठा असातनाही डिग्रसचे पाणी घेण्यात आल्याने स्थानिक शेतकºयांत संतापाची लाट उसळली आहे. पाणी नेल्यानंतर नांदेड शहरातील दोन आमदारांतील राजकारण रंगात आले आहे. शेतकºयांना पाणी देण्यासाठी डिग्रसच्या पाण्याचा वापर केला जात आहे, हेच यावरून दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी या नावाखाली नांदेड जिल्ह्यातील शेती सुजलामसुफलाम केली जात असून पालम, पूर्णा तालुक्यातील शेतकºयांची राखरांगोळी केली जात आहे. प्रत्येक वेळी पाणी देताना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्थानिक जनतेला विश्वासात घेत असतात. यावेळी मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. हक्काचे पाणी असूनही रातोरात जिल्हा प्रशसनाच्या मदतीने नांदेडच्या पुढाºयांनी पाणी पळविले आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक जनतेची माती करीत नांदेडला सढळ हाताने पाणी सोडून दिले आहे. यामुळे शासनाच्या कारभारावर शेतकरीवर्ग व स्थानिक जनता नाराज आहे. डिग्रस बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
आरक्षण डावलून दिले पाणी
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ६८ टक्के पाणी नांदेडसाठी आणि ३२ टक्के पाणी पालम तालुक्यासाठी राखीव ठेवले आहे. बंधाºयात केवळ २६ दलघमी पाणी असताना २० दलघमी पाणी नांदेड जिल्ह्यासाठी सोडण्यात आले. सोडलेले पाणी आरक्षणाच्या कोणत्या नियमानुसार सोडले, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. २६ दलघमीतून केवळ ६८ टक्के पाणी नांदेड जिल्ह्याला देणे आवश्यक होते. परंतु पालम तालुक्यासाठी आरक्षित केलेले पाणीही नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे पालम तालुक्यालावर एका अर्थाने अन्यायच करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.