परभणी: गोदापात्रातच शोधावं लागतंय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:08 AM2019-05-14T00:08:42+5:302019-05-14T00:10:30+5:30
तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पालम तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. याच नदीवर तालुक्यातील डिग्रस येथे बंधारा बांधण्यात आला आहे. आठ महिने या बंधाºयात काठोकाठ तुडूंब पाणी भरलेले पहावयास मिळते; परंतु, यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात केवळ गाळच शिल्लक राहिल्याने जेमतेम पंधरा दिवस पाणी कसेबसे शिल्लक होते. जानेवारी महिना उजाडताच गोदावरी नदीच्या पात्रातील पूर्णत: आटत गेल्याने गोदावरीचे वाळवंट झाले आहे. गोदाकाठच्या गावांना नदी असूनही पिण्यासाठी शेतशिवारातील पाणी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. गोदावरीच्या पात्रात लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे. पाण्याअभावी या पाईपलाईन बंद पडलेल्या आहेत.
शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व जनावरांसाठी थोड्याफार प्रमाणात हिरवा चारा मिळावा, याकरीता शेतकºयांनी जागोजागी गोदावरी नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. २४ तासांत या खड्यांना तासभर मोटार चालतील एवढे पाणी येत आहे. रात्रंदिवस जागून या खड्यातून पाणी शेतापर्यंत नेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
डिग्रसचे पाणी लवकर सोडून देण्यात आल्याने गोदावरीचे पात्र पूर्णत: वाळवंट झालेले आहे. परिणामी गोदाकाठ भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासन : बघ्याची भूमिका
४पालम तालुक्यातील बहुतांश गावे ही गोदाकाठावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांना उन्हाळ्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; परंतु, गोदाकाठावर असलेल्या पालम तालुक्यातील गावांना मात्र दुष्काळाची साधी जाणीवही होत नाही. मात्र यावर्षी पालम तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान राहिले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गावे डिग्रस बंधाºयातील पाण्याकडे अपेक्षेने पाहत होते.
४या बंधाºयात गतवर्षीच्या पावसाळामुळे मूबलक पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षीही आपल्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे स्वप्न उराशी बाळगून डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ होते; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फेरत डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून हा बंधारा खाली केला. कोणताही विचार, विरोध न करता पाणी सोङण्याचा सोपस्कार पाटबंधारे विभागाने पार पाडला.
४ शेतकºयांचा व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच गोदा नदीकाठावरील व डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनाही नदीपात्रातच पाणी शोधावे लागत असल्याची वेळ आली आहे.