परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:10 AM2019-05-06T00:10:41+5:302019-05-06T00:11:02+5:30

तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Parbhani: Water harvesting is being done in the Muli Bandh | परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी तसेच इतर छोट्या-मोठ्या नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. तालुक्यात असलेल्या लघू पाझर तलावांनी तळ गाठल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील मुळी परिसरात गोदावरी नदीपात्रात मुळी बंधाराला उभारण्यात आला. या बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे नदीला आलेल्या पुरात निखळून पडल्याने बंधाºयात साचणारे पावसाचे पाणी दरवाजांअभावी वाहून जात आहेत. यामुळे नदीपात्र कोरडेठाक पडून गोदाकाठी असलेल्या गावांना ही कधी नव्हे त्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या बंधाºयाला तत्काळ उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी या अनेक वेळा करण्यात आली; परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या बंधाºयाला पावसाळ्यापूर्वीच उचलपद्धतीचे दरवाजे बसविले असते तर लाभक्षेत्रातील शेतकºयांना व गोदा काठावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली नसती, असे बोलले जात आहे.
उपाययोजनांसाठी नागरिकांनी घेतली तहसील प्रशासनाकडे धाव
४गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि मुळी बंधाºयाच्या अनुषंगाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनावर निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष ओमकार पवार, शिवाजी कदम, माणिकराव कदम, सुरेश इखे, सुनिल पौळ, शिवाजी जाधव, गोपीनाथराव भोसले आदींच्या सह्या आहेत.
प्रशासनासमोर मांडल्या मागण्या
४दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर बंदी घालावी, जनावरांच्या संख्येनुसार गावागावात चारा छावण्या उभाराव्यात, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. गोरगरिब शेतकरी, शेतमजूर आदी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे, अंशदायी उंबरठा उत्पन्नावर अधारित पीक कापणी प्रयोग रद्द करून दुष्काळी भागातील नदीपात्रात पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
पाटबंधारे विभागाची टाळाटाळ
४मुळी बंधाºयाचे दरवाजे निखळून पडून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे; परंतु, अद्यापही या बंधाºयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने पाटंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Parbhani: Water harvesting is being done in the Muli Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.