परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:51 AM2017-12-30T00:51:47+5:302017-12-30T00:52:07+5:30

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

Parbhani: Water from malleable canals | परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

परभणी : नादुरुस्त कालव्यांतूनच पाणी

googlenewsNext

प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचा जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच लाभ होतो. मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अवर्षण परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडी प्रकल्पातच पुरेसा पाणीसाठा जमा झाला नव्हता. परिणामी परभणीकरांनाही हे पाणी मिळाले नाही. मागील वर्षीचा अपवाद वगळता त्यापूर्वी सुमारे पाच वर्षे या कालव्यातून पाणीच वाहिले नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच शाखा कालवे आणि वितरिकांची दुरवस्था झाली. यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला. त्यामुळे जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळणार, हे जवळपास निश्चित होते. शेतकरी व राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला रबी हंगामाच्या चार पाणीपाळ्याही मंजूर झाल्या आहेत. पहिली पाणी पाळी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातून वाहणाºया कालव्याची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र दुरुस्तीसाठी मुबलक निधी नसल्याने ही कामे झाली नाहीत. परिणामी तात्पुरती डागडुजी करुनच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मुख्य कालव्यांसह उपकालव्यांची योग्य दुरुस्ती झाली असती तर पाण्याची वहन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकºयांना झाला असता. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात या कालव्याचे बांधकाम झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी कालव्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी फरशी फुटली आहे तर काही ठिकाणी पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कालव्यांचे आयुष्यमान वाढवायचे असेल तर दुरुस्ती, देखभालीसाठीही निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.
सिंचनातील अडथळे
शासकीय यंत्रे वापरणे शक्य
४परभणी जिल्ह्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या इतर विभागात असलेली यंत्रे, मशिनरी वेळीच उपलब्ध करुन दिली तर योग्य वेळी आणि नियमित कालव्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे. निधी नसला तरी आवश्यक ती शासकीय मशिनरी आणि यंत्रणा वापरली तर दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांत समन्वय वाढवून शासकीय मशिनरीच्या साह्याने दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे.
गाळ काढला... भरावही केला...
४जायकवाडी कालव्याचे पाणी जास्तीत जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांमधील गाळ उपसून घेतला आहे. आवश्यक त्या ठिकाणी भरावही टाकला आहे. पाथरी, मानवत, दैठणा, लोहगाव आणि परभणी या विभागांमध्ये दुरुस्तीची कामे केली आहेत. १७ जेसबी मशीन, दोन टिप्पर, ३ डोजर या मशिनरींच्या साह्याने कामे झाली आहेत. यापुढेही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली.

Web Title: Parbhani: Water from malleable canals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.