परभणी : नळांपर्यंत पोहोचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:53 PM2020-03-23T22:53:14+5:302020-03-23T22:53:35+5:30
येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येलदरी येथून शहरातील जलकुंभात दाखल झालेले पाणी चाचणीच्या निमित्ताने नळाद्वारे शहरवासियांच्या घरात पोहचले आहे. रविवारी महानगरपालिकेने नवीन योजनेच्या जलवाहिनीची चाचणी घेतली असून दर्गारोड परिसरातील अनेक भागात येलदरीच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता तरी नळ जोडणीचे प्रमाण वाढेल, अशी मनपाला अपेक्षा आहे.
युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजेनेतून परभणी शहरात उभारलेली पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतर पूर्णत्वाला गेली आहे. या योजनेवर नागरिकांनी नळ जोडणी घेतल्यानंतर शहराल पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र महिनाभरापासून नळ जोडणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे.
मनपा प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. साधारणत: ८०० ते ९०० अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. मात्र नवीन नळ जोडणीचा आकडा १५ ते २० पर्यंतच पोहचला आहे. शहरवासियांनी नळ जोडणीसाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने रविवारी मनपाने दर्गारोड भागातील अनेक वसाहतींना नव्या योजनेतून पाणीपुरवठा केला.
थेट येलदरी येथून जलवाहिनीद्वारे आलेले पाणी नागरिकांच्या नळापर्यंत पोहचती करण्यात आले. या माध्यमातून मनपाने जलवाहिनीची चाचणीही घेतली आणि नागरिकांना नियमित, मूबलक पाणी मिळणार असल्याची शाश्वती दिली आहे. रविवारी दर्गारोड परिसरातील वसाहतींबरोबरच गंगाखेड रोडवरील अनेक वसाहतींमध्ये या योजनेचे पाणी पोहचती करण्यात आले. त्यामुळे आता नव्या योेजनेवर नळ जोडणी घेण्यास पुढाकार घेतील, अशी अपेक्षा मनपा प्रशासनाला आहे.
सद्यस्थिती : २० दिवसांतून एक वेळा पाणी
४शहरात सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या योजनेची जलवाहिनी कुचकामी ठरत आहे. पाण्याचा दाब सहन न झाल्याने ती जागोजागी फुटत असून पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
४नागरिकांचा पाणीपुरवठ्यासंदर्भातील अनुभव फारसा चांगला नाही. त्याचाही परिणाम नळ जोडणीवर होत आहे. नियमित आणि दररोज पाणीपुरवठा होईल का, याची शाश्वती नसल्यानेच नागरिक जोडणी घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे मनपाने दोन दिवसांपूर्वी नळांना पाणी सोडून चाचणी घेण्याबरोबरच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिनाभरापासून जलकुंभात पाणी
४युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात १६ नवीन जलकुंभ वाढले आहेत. महिनाभरापूर्वी येलदरी येथील पाणी जलकुंभात येऊन पोहचले आहे. जलकुंभांची चाचणीही पूर्ण झाली आहे.
४नागरिकांनी पुरेशा प्रमाणात नळ जोडणी घेतल्यानंतर त्या त्या झोनवरुन नवीन योजनेचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नळ जोडणी आणि जुन्या नळधारकांची जोडणी अधिकृत करण्याच्या प्रतीक्षेत आहे.