परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:59 AM2019-02-04T00:59:01+5:302019-02-04T00:59:12+5:30

तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.

Parbhani: Water shortage in 25 villages | परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

परभणी : २५ गावांत पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी ): तालुक्यातील २५ गावांना भर हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र पंचायत समिती कार्यालयात दाखल झालेल्या विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३४ प्रस्तावावरुन दिसून येत आहे.
गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील गावांसह गोदावरी काठावर असलेल्या गावांनाही आॅक्टोबर महिन्या अखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. नोव्हेंबर २०१८ या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिग्रहणाचे ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात विहीर, बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली होती. भर हिवाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील सुरळवाडी, डोंगरगाव शे., डोंगरजवळा, गोदावरी तांडा, पांगरी, मरगीळवाडी, वाघदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, ढवळकेवाडी, नरळद, सिरसम, कर्लेवाडी, उंबरवाडी, देवकतवाडी, चिम्मा नाईक तांडा, लिंबेवाडी, खादगाव, वाघदरा, वाघदरा तांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव आदी २५ गावांतील ३३ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील २७ प्रस्ताव हे तहसील कार्यालयांतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे अंतिम आदेशाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. यात डोंगरगाव शे., पांगरी, नरळद, मरगीळवाडी, वागदेवाडी, उंडेगाव, सिरसम, ढवळकेवाडी, देवकतवाडी आदी १४ गावात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांना तहसील प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित १३ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. संबंधित गावच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर विविध गावातील या १३ प्रस्तावांना विहीर, बोअर अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गावांच्या तलाठी व मंडळ अधिकाºयांनी पंचनामा करुन आपला अहवाल सादर केल्यानंतर या १३ प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केल्यानंतर हे प्रस्ताव कार्यालयीन कामकाजाच्या लालफितीत महिन- महिना मंजुरी अभावी पडून राहत असल्याने बहुतांश गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावरच पाण्याचे नियोजन करुन तातडीने गावकºयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. गावात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने व तालुका प्रशासनाने तातडीने अधिग्रहणासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांतून होत आहे.
अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलकडे
४तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई नियोजनाचे ठरावासह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त आहेत. अधिग्रहणासाठीचे हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तहसीलकडे सादर केले आहेत. तहसीलदारांच्या आदेशाने अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देत असल्याचे पं.स. पाणीपुरवठा विभागातील बोबडे यांनी सांगितले.
मंडळ अधिकाºयांच्या अहवालानंतर मंजुरी
४पंचायत समिती कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या विहीर, बोअर, अधिग्रहणाच्या प्रस्तावांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निकषाच्या आधीन राहत तलाठी, मंडळ अधिकाºयामार्फत पंचनामा करुन त्यांचा अहवाल कार्यालयास प्राप्त होतो. त्यानंतरच अधिग्रहणाच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आदेश दिला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे अव्वल कारकून रघुराज जाधव यांनी दिली.

Web Title: Parbhani: Water shortage in 25 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.