परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:39 AM2019-02-28T00:39:58+5:302019-02-28T00:40:28+5:30

ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़

Parbhani: Water shortage work by 29 lakhs | परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़
जिल्ह्यात दरवर्षी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते़ संबंधित गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ ज्या गावांमध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो़; परंतु, ज्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होवू शकते, अशा ठिकाणी सुरुवातीला विहीर, बोअर अधिग्रहण करून टंचाई निवारणाचा प्रयत्न केला जातो़ तर बहुतांश वेळा पाणीपुरवठा योजनेची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर त्या गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत होवू शकतो़ या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़
या अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी तांडा या गावासाठी ५२ हजार रुपये, बडवणी या गावासाठी ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे़ परभणी तालुक्यामध्ये १० गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ त्यामध्ये हनुमान तांडा येथे ९७ हजार ९००, आळंद ८७ हजार ३००, गव्हा १ लाख १९ हजार २००, पिंपळगाव १ लाख ८९ हजार ७००, किन्होळा १ लाख ९७ हजार ८००, अमदापूर १ लाख ८७ हजार ६००, इठलापूर ७३ हजार ५००, नरसापूर २ लाख १० हजार ५५०, गोविंदपूर २ लाख ७९ हजार २०० आणि मांगणगाव येथे नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ३० हजार ५० रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे़ वरील सर्व गावांमध्ये पाण्याचीटंचाई निर्माण झाल्याने नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या रकमेतून तातडीने कामे हाती घ्यावीत आणि गावांना टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे़
कामांना गती द्या
४ग्रामीण भागामध्ये टंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक प्रस्तावही दाखल होत आहेत़ या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास विलंब लागतो़
४त्यामुळे निधी मंजूर होवूनही संबंधित गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ तेव्हा एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांनी तातडीने काम हाती घेऊन गावांतील पाणीटंचाई दूर करावी, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करावीत, अशी मागणी होत आहे़
चुडाव्यात ५ लाखांचे काम
टंचाई निवारणासाठी तात्पुरती पुरक नळ योजना घेण्याची मुभा आहे़ या अंतर्गत चुडावा गावातून प्रस्ताव दाखल झाला असून, जिल्हाधिकाºयांनी ५ लाख ७ हजार २०० रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तात्पुरत्या पुरक नळ योजनेत अंतर्गत जलवाहिनी वाढविली जाते़ तसेच जलस्त्रोतापर्यंतची जलवाहिनी दुरुस्त करण्यात येते़ चुडावा येथील पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे़ योजनेची दुरुस्ती केल्यास गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ या उद्देशाने तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आह़े
प्रलंबित प्रस्ताव निकाली काढा
टंचाई नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींमधून दाखल झालेले विहीर अधिग्रहण, टँकरचे अनेक प्रस्ताव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत़ त्यामुळे गावकºयांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होवून टंचाई निवारणाची आशा लागलेली असते़ दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करून हे प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Water shortage work by 29 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.