परभणी: ६० हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:08 AM2019-04-29T00:08:46+5:302019-04-29T00:08:58+5:30
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, २६ एप्रिलअखेर ५९ हजार ६७५ ग्रामस्थांना ४४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
यावर्षी जिल्ह्यात टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ भूजल पातळी १२ मीटरने खोल गेली असून, प्रकल्पांमध्येही पाणीसाठी शिल्लक नाही़ परिणामी ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना प्रकल्पातील पाणी राखीव ठेवले असल्याने थोड्याफार प्रमाणात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र अशा प्रकारचे नियोजन नसल्याने हा भाग टंचाईने होरपळत आहे़ सद्यस्थितीला ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत़ नळाला पाणी येत नाही़ गावातील विहिरी, बोअर आटले आहेत़ परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ काही भागात शेत शिवारातून पाणी उपलब्ध केले जात असले तरी प्रत्येक गावात पाणी मिळणे शक्य नाही़ परिणामी प्रशासनाने टँकर सुरू केले आहे़
सद्यस्थितीला पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू आणि जिंतूर या सहा तालुक्यांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़
पालम तालुक्यात २२ हजार ८४० ग्रामस्थांना १६ टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ पूर्णा तालुक्यातील पाच गावांमध्ये ९ हजार ७०७ ग्रामस्थांना ८ टँकरच्या सहाय्याने, गंगाखेड तालुक्यातील ३ गावांतील ३ हजार ४१७ ग्रामस्थांना ३ टँकरच्या सहाय्याने, सोनपेठ तालुक्यातील २ गावांमधील ६ हजार ६०० ग्रामस्थांना २ टँकर, सेलू तालुक्यातील ६ गावांमधील ७ हजार ८३६ ग्रामस्थांना ६ टँकरच्या सहाय्याने आणि जिंतूर तालुक्यातील ८ गावांमधील ९ हजार २७५ ग्रामस्थांना ९ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ पालम तालुक्यात सर्वाधिक १६ टँकर सुरू आहेत़ त्यातील १४ टँकर खाजगी आहेत़ त्या खालोखाल जिंतूर तालुक्यात ९, पूर्णा ८ आणि सेलू तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत़ एकूण ४४ टॅँकरपैकी ३८ खाजगी टँकर सुरू असून, सहा शासकीय टँकर आहेत़ विशेष म्हणजे मागील वर्षी सुमारे ४२ टँकर्स सुरू केले होते़ यावर्षी ४४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ आगामी काळात टँकरची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़
नळयोजनांची दुरुस्तीची कामे
४ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने काही भागात नळ योजना दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, त्या माध्यमातूनही ग्रामीण भागाला पाणी टंचाईपासून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उर्वरित रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अडीच हजार : फेºया मंजूर
४टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेल्या टँकरने एकूण २ हजार ५८९ फेºया कराव्याच्या आहेत़ त्यापैकी प्रत्यक्षात २ हजार ३३४ फेºया आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत़ २५५ फेºया बाकी आहेत़
४ पालम तालुक्यात टँकरने ६६५ फेºया पूर्ण केल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ५०३, गंगाखेड तालुक्यात १६८, सोनपेठ १०२, सेलू २९४ आणि जिंतूर तालुक्यात ६०२ फेºया पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी देण्यात आले आहे़
२१५ विहिरींचे अधिग्रहण
टंचाईग्रस्त गावांत टँकर्सबरोबरच अधिग्रहणाच्या सहाय्यानेही पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ ज्या गाव परिसरात विहिरीला पाणी उपलब्ध आहे़ ती विहीर अधिग्रहण करून गावाला पाणी दिले जात आहे़
प्रशासनाने आतापर्यंत २१५ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ५८ विहिरींचे अधिग्रहण झाले असून, परभणी तालुक्यात ८, पालम ३९, पूर्णा २४, सोनपेठ १५, सेलू १९, पाथरी ४, जिंतूर ३८ आणि मानवत तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़
अधिग्रहण केलेल्या विहिरींपैकी ३३ विहिरींचे पाणी टँकरसाठी राखून ठेवले आह़े तर १८२ विहिरींचे पाणी प्रत्यक्ष ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जात आहे़ त्यामुळे अधिग्रहणाच्या माध्यमातूनही ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे.
या गावांमध्ये टँकर सुरू
४पालम तालुका- चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामपूर तांडा, पेंडू खु़, सादलापूर, पेंडू बु़, बंदरवाडी, पेठशिवणी, पेठ पिंपळगाव, सातेगाव़
४पूर्णा तालुका : पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूऱ
४गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी़
४सोनपेठ तालुका : नरवाडी, कोथाळा़
४सेलू तालुका : तळतुंबा, वालूर, पिंप्री गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़
४जिंतूर तालुका : मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी़