परभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:12 PM2019-06-19T23:12:33+5:302019-06-19T23:13:21+5:30

शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर दिली आहे़

Parbhani water supply scheme will be operational by the end of August | परभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार

परभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर दिली आहे़
आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अधिवेशनांतर्गत विधानसभेत परभणीचा पाणीप्रश्न उपस्थित केला होता़ त्यात राहटी बंधाऱ्यात मुबलक पाणी उपलब्ध असूनही १७ ते १८ दिवसाला परभणीकरांना का पाणी मिळत आहे? गावठाण भागात टँकर सुरू नाहीत़, मनपा हातपंप दुरुस्त करीत नाही़ त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे आ़ पाटील यांनी म्हटले आहे़ या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहरात मनपातर्फे टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे़ शहराच्या पाणीपुरवठा योजनेंर्गत मुख्य जलवाहिनी, दोन जलकुंभ, एक एसबीआर व २६६ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, योजनेचे हॅड्रोलिक टेस्टींग प्रगतीपथावर आहे. ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़ त्याशिवाय अमृत योजनेंतर्गत ६७ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ६ जलकुंभ व इतर १६६ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती आ.डॉ. पाटील यांनी दिली.

Web Title: Parbhani water supply scheme will be operational by the end of August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.