परभणी :राहटी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:18 AM2019-01-02T00:18:23+5:302019-01-02T00:18:59+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे.

Parbhani: Water theft from the residence of Rahati | परभणी :राहटी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी

परभणी :राहटी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे.
परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. १.५ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून हा बंधारा पाण्याने पूर्ण भरल्यानंतर परभणी शहराला साधारणत: दीड महिना पाणी पुरवठा होऊ शकतो. यावर्षी जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेण्यात आले आहे. परभणी शहरासाठी निम्न दुधना आणि सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने आता सिद्धेश्वर प्रकल्पातून शहरासाठी पाणी घेतले जात आहे.
राहटी येथील बंधाºयात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाल्यानंतर विद्युत मोटारीच्या सहाय्याने त्याचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके स्थापन केली असली तरी या पथकांकडून कारवाई होत नसल्याने सर्रास पाण्याचा उपसा सुरु आहे. उपलब्ध असलेले पाणी जास्तीत जास्त पुरविण्यासाठी हा पाणी उपसा रोखणे गरजेचे आहे; परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
राहटी बंधाºयात सध्या उपलब्ध असलेले पाणी ५ कि.मी.पर्यंत साठविले आहे. परभणी तालुक्यातील नांदगाव खु., अलापूर, पांढरी, नांदगाव बु., साबा, सुकापूरवाडी, संबर, पिंपळगाव टोंग, पिंपळगाव कुटे, सोन्ना या गावांच्या परिसरात हा पाणीसाठा उपलब्ध आहे.
या सर्वच गावांच्या शिवारांमधून सुमारे ५८१ विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा उपसा होणार असल्याची माहिती महापालिकेने महावितरण कंपनीला दिली असून या भागातील विद्युत मोटारींचा वीज पुरवठा खंडित करण्याची मागणी केली आहे; परंतु, प्रत्यक्षात महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होत नसल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे.
सद्यस्थितीत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
अशी आहे मोटारींची संख्या
४उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राहटी बंधाºयाच्या दोन्ही काठावरुन पाण्याचा अवैध उपसा होत आहे. राहटी बंधाºयाचे पात्र परभणीसह वसमत तालुक्यातील दोन गावांच्या शिवारातही पोहचले आहे. त्यानुसार नांदगाव खु. शिवारात १०५, पांढरी आ.शिवारात ४६, नांदगाव बु. शिवारात ९०, साबा शिवारात १०, सुकापूरवाडी शिवारात २०, संबर शिवारात ६०, पिंपळगाव टोंग शिवारात ७० आणि वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे शिवारात १५० व सोन्ना शिवारात ३० अशा ५८१ विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा उपसा होत असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदोपत्रीच
४दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल, पाटबंधारे विभाग, महावितरण आणि पोलीस प्रशासनातील अधिकाºयांचा समावेश असलेल्या पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी बंधारा परिसरात जावून कारवाई करणे अपेक्षित आहे, विशेष म्हणजे पथकासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे; परंतु, हे पथक कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने राहटी बंधाºयातून पाण्याचा उपसा होत असल्याची माहिती दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने पाण्याचा उपसा वाढत आहे.
काही जणांनी काढून घेतल्या मोटारी
राहटी बंधाºयाच्या परिसरात असलेल्या नांदगाव येथील काही नागरिकांनी प्रशासनाने आवाहन केल्यानंतर स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. पुलाच्या परिसरात मंगळवारी भेट दिली असता, या भागात विद्युत मोटारी सुरु नसल्याची बाब दिसून आली; परंतु, नदीपात्राच्या दूर अंतरावर मात्र इतर गावांमधून विद्युत मोटारीद्वारे उपसा सुरु असल्याचेही सांगण्यात आले.
४दरम्यान, पाणी चोरी होत असताना व शासनस्तरावरुन या संदर्भात कारवाईचे आदेश दिले असतानाही नियुक्त पथकाकडून का कारवाई केली जात नाही, असा सवाल शहरातील नागरिकांमधून केला जात आहे.

Web Title: Parbhani: Water theft from the residence of Rahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.