परभणी : पनवेल रेल्वेचे गंगाखेड येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:42 AM2018-10-02T00:42:42+5:302018-10-02T00:43:30+5:30
अनेक वर्षापासून नांदेड- पनवेल रेल्वेला थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून १ आॅक्टोबरपासून गंगाखेड स्थानकावर या रेल्वेला थांबा देण्यात आला. यावेळी गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातील प्रवाशांनी आनंद व्यक्त करीत रेल्वेचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): अनेक वर्षापासून नांदेड- पनवेलरेल्वेला थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून १ आॅक्टोबरपासून गंगाखेड स्थानकावर या रेल्वेला थांबा देण्यात आला. यावेळी गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातील प्रवाशांनी आनंद व्यक्त करीत रेल्वेचे स्वागत केले.
नांदेड-पनवेल एक्सप्रेसला गंगाखेड येथे थांबा मिळण्यासाठी गंगाखेड येथील रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व खा. संजय जाधव, शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर सर्व पक्षीय रेलरोके आंदोलनासह संतोष मुरकुटे यांनी स्वाक्षरी अभियान राबवून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते. विविध संघटनांनीही पाठपुरावा केला. गंगाखेड-पालम तालुक्यातील नागरिकांना मुंबई व पुण्याला जाण्यासाठी हा थांबा मिळणे आवश्यक होते. सोमवारी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व महिलांनी या रेल्वेचे स्वागत करीत रेल्वेचे चालक मोरसू सतय्या, बबलूकुमार, आकाशकुमार, महेंद्र नामदेव यांचा सत्कार केला. नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकाल राभा, अजयकुमार शुक्ला, टी.आय. जितेंद्रनाथ, रेल्वे पोलीस सहाय्यक सुरक्षा आयुक्त एम.कोंडय्या, स्टेशन प्रबंधक राकेशकुमार, स्टेशन मास्तर कुमार, कुमार राजेशसिंह आदींसह रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खा. बंडू जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम, संतोष मुरकुटे, बाबासाहेब जामगे, अॅड.गौतम भालेराव, गोविंद यादव, राजश्री जामगे, विष्णू मुरकुटे, सखूबाई लटपटे, पोनि. सोहन माछरे, शेख मुस्तफा, सत्यपाल साळवे, शेख युनूस, बालासाहेब पारवे, भास्कर काळे, डॉ.देविदास चव्हाण, मधुकर टाक, दगडू सोमाणी, बालाजी मुंडे, दीपक मुरकुटे, अजीत स्वामी, विश्वनाथ सातपुते, रणधीरराजे भालेराव, पिराजी कांबळे, बाबुराव गळाकाटू, संगीता जामगे, अंकुश कांबळे आदी उपस्थित होते.