परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:02 AM2019-08-29T00:02:50+5:302019-08-29T00:03:14+5:30
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.
पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परभणी जिल्ह्यात गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे जिंतूर, सेलू आणि परभणी या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे परभणीत मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस घोषणा होईल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.
शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि आरोग्याच्या संदर्भाने जिल्हा अविकसित आहे़ या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत़ जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी तसेच गंभीर आजारावरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे़ यासाठी जिल्हाभरात जनआंदोलनही उभे राहिले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली खरी़ मात्र त्या पुढे कुठलीही हालचाल झाली नाही़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेची निश्चिती, महाविद्यालयातील पदनिर्मिती यासह प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया संथगतीने आहे़ त्यामुळे या प्रश्नाला चालना देण्यासाठी कालमर्यादा ठेऊन ठोस घोषणा करणे अपेक्षित आहे़ तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी परभणी शहरालगत नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रश्नही रखडलेला आहे़ बोरवंड परिसरात एमआयडीसीसाठी जमीन अधिगृहित करण्याचे कामही अद्याप झाले नाही़ शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा निश्चित नसल्याने हा प्रश्न रखडला आहे़
त्यामुळे मावेजाची घोषणा करून एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्ष एमआयडीसी उभारणीला सुरुवात केली तर जिल्ह्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो; परंतु, राजकीय उदासिनतेमुळे केवळ घोषणाच झाल्या असून, घोषणा झालेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्याचा विकासही संथगतीने होत आहे़ याशिवाय सिंचनासाठी भरीव निधी विजेच्या समस्या, कृषीप्रधान उद्योगांना चालना देणे या प्रश्नांबरोबरच शेतकºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
मागील घोषणाचीही संथ अंमलबजावणी
४जिल्ह्यात रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत़ गंगाखेड रस्त्याचा प्रश्न तर येथील खड्ड्यामुळे राज्यभरात गाजला होता़ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ त्यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामांचे ई-उद्घाटन करण्यात आले़ गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यांचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली़
४त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू होत असल्याचे सांगितले़ प्रत्यक्षात उद्घाटनानंतर प्रमुख रस्त्यांची कामेच अतिशय संथगतीने होत आहेत़ वर्षभरापासून गंगाखेड आणि जिंतूर रस्ता खोदून ठेवला असून, काम अद्याप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे मुख्यमंत्री या प्रश्नांतही लक्ष घालतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे़