परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:03 AM2018-09-30T00:03:39+5:302018-09-30T00:04:22+5:30

दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.

Parbhani: Whitner addict students addicted! | परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत.
मागील एक ते दोन वर्षापासून हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरातील मुलांमध्ये व्यसन पहावयास मिळत आहे. १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत व्हाईटनर मिळत आहे. मुळात याचा उपयोग चुकीने लिहिलेला मजकूर मिटविण्यासाठी केला जातो. मात्र हल्ली हे व्यसनाचे साधन बनले आहे. विशेषत: शहरातील किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपरीवरून व्हाईटनर सर्रास विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. हे व्हाईटनर कोणास द्यावे, याचे निर्बंध नसल्याने ८ वर्षापासून ते १८ वर्षा पर्यतचे विद्यार्थी सहजतेने मिळवितात. ही नशा एवढी गंभीर आहे की, एकदा व्यसन लागले की, सुटत नाही. नशा केली नाही तर ती व्यक्ती बैचेन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. शहरातील हुतात्मा स्मारक, शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरात शाळा व महाविद्यालये आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. नशा करणारे २०० विद्यार्थी शहरात सापडतील. हे विद्यार्थी शाळाबाह्य बनले आहेत. पाच ते दहा विद्यार्थ्यांचा गट तयार करून नशा केली जाते. नशेबरोबरच सिगारेट, गुटखा व दारूच्या नशेकडेही हे विद्यार्थी वळत आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्याच बरोबर पॉकेट मारणे, मारहाण करणे, मुलींची छेडछाड हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात तसेच मोकळ्या मैदानात सर्रास वावरताना दिसून येतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन व्हाईटनरच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.
व्हाईटनर शरीरात पोहोचल्यानंतर शरीर बधीर करते. त्यानंतर वेडेपणा, स्मृतिभ्रंश, मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी व्हाईटरनरची नशा आहे. एकदा वास घेतल्यानंतर तो वेळोवेळी घ्यावासा वाटतो. चरस, गांजा, अफू जेवढे घातक आहेत. तेवढाच व्हाईटनरचा वास सुद्धा घातक आहे.
-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बालरोग तज्ज्ञ, जिंतूर
मुलांवर संस्कार हे आई-वडिलांकडून होणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनही दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात वेगवेगळ्या नशेबद्दल जनजागृती करीत आहे. नशेपासून विद्यार्थी दूर राहण्यासाठी अधिक प्रभावीपणे जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.
-सुरेश नरवाडे,
पोलीस उपनिरीक्षक, जिंतूर

Web Title: Parbhani: Whitner addict students addicted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.